"बाइक ऍम्ब्युलन्स'मुळे 3600 रुग्णांना जीवदान 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

मुंबई - मोटार बाईक ऍम्ब्युलन्स सेवा सुरू होऊन गुरुवारी एक वर्ष पूर्ण झाले असून, या कालावधीत सुमारे तीन हजार 600 रुग्णांना जीवदान मिळाले आहे. वर्षभरात मुंबईत नव्याने 10, तर मेळघाट आणि पालघर येथे प्रत्येकी पाच अशा एकूण 30 बाइक ऍम्ब्युलन्स राज्यात रुग्णांना सेवा देत आहेत. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते पालघर येथे आज बाइक ऍम्ब्युलन्स सेवेचा प्रारंभ करण्यात आला. 

गेल्या वर्षी दोन ऑगस्टला मुंबईत 10 बाइक ऍम्ब्युलन्सचा प्रारंभ करण्यात आला. ही सेवा सुरू झाल्याच्या काही तासंतच वैद्यकीय मदतीसाठी कॉल येऊ लागले. ज्या भागात चारचाकी रुग्णवाहिका पोचण्यास अडचण निर्माण होते, अशा ठिकाणी बाइक ऍम्ब्युलन्स सेवा उपयुक्त असल्याचे दिसून येत आहे. या बाइक ऍम्ब्युलन्सचे चालक डॉक्‍टर असल्याने आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तातडीने प्रथमोपचार मिळत आहे. 

वर्षभरातील सेवा  -

3,600  - एकूण रुग्णांना जीवनदान  -

2,700  - आपत्कालीन परिस्थितीतील रुग्ण  

390 - अपघातातील रुग्ण  

42  - गर्भवती महिला  

442 - अन्य रुग्ण 

Web Title: Bike ambulance 3600 patients gift of life