उल्हासनगरात मोटरसायकल चोरांची टोळी गजाआड

दिनेश गोगी
गुरुवार, 12 एप्रिल 2018

उल्हासनगर : विविध भागातून मोटरसायकली चोरणाऱ्या चौकडीला उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी गजाआड केले असून त्यांच्याकडून सुमारे पावणे चार लाख रुपये किमतीच्या 12 गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी ही माहिती दिली.

शहाड परिसरात मोटरसायकलवर संशयितरित्या फिरणाऱ्या यश आनंद राव व अहमद शहा यांना गुन्हे अन्वेषण पोलिसांनी गस्तीच्या वेळी ताब्यात घेतले असता,त्यांच्या कडे असलेली गाडी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले.त्यांना खाक्या दमात घेतले असता त्यांच्या टोळीतील आणखीन दोघांची नावे समोर आली.त्यानुसार सचिन पवार, प्रदीप उर्फ रॉबिन यांच्यावर झडप घालण्यात आली. अहमद शहा मॅकेनिक आहे. या चौकडीकडून 12 गाड्या मिळाल्या आहेत.या कारवाईत पोलीस निरीक्षक मनोहर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशरुद्दीन शेख,युवराज सालगुडे,श्रीकृष्ण नावले आदी पोलिसांनी सहभाग घेतला आहे.गजाआड करण्यात आलेल्या चौकडीला न्यायालयात हजर केले असता, त्यांना न्यायालयीन कष्टडीत ठेवण्याचे आदेश दिल्याने या चौकडीची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.ज्या नागरिकांच्या ह्या मोटरसायकली आहेत,त्यांना त्यांच्या ह्या गाड्या न्यायालयीन प्रक्रिये नंतर परत देण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी सांगितले.

Web Title: bike thief arrested in ulhasnagar