डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

काळाचौकी येथे डंपरच्या धडकेत 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी डंपर चालकाला अटक केली आहे.

मुंबई : काळाचौकी येथे डंपरच्या धडकेत 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी डंपर चालकाला अटक केली आहे. मोहम्मद अहमत मोहम्मद अफजल खान (18) असे मृत तरुणाचे नाव असून तो माझगाव येथील रहिवासी आहे.

शनिवारी दुपारी तो चिंचपोकळी येथून स्कुटीवरून जात असताना डंपरने त्यांना मागून धडक दिली. त्यात जखमी झालेल्या खानला परळ येथील केईएम रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

खान हा स्कूटीवरून खाली पडल्यानंतर डंपरच्या चाकाखाली आला. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. दरम्यान, याप्रकरणी लिंगप्पा भुताली बालभट्टी (40) या डंपर चालकाला काळाचौकी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरोधात भरधाव वेगाने गाडी चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

web title : biker killed in accident


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: biker killed in accident