खारीगाव रेतीबंदरजवळ हॉटेल व्यावसायिकावर गोळीबार 

हॉटेल व्यावसायिक गंभीर जखमी
हॉटेल व्यावसायिक गंभीर जखमी

कळवा : मुंब्रा येथून आपल्या नातेवाईकाकडून जेवण आटोपून मुंबई खार येथील आपल्या घरी जात असताना एका हॉटेल व्यावसायिकावर एका अज्ञात व्यक्तीने रेतीबंदर येथील अमित गार्डननजीकच्या सर्व्हिस रोडनजीक गोळीबार केल्याने त्यात हॉटेल व्यावसायिक गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (ता. 12) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.

मुंबई (खार) येथे राहणारे मेहबूब खान (42) हे शनिवारी आपली पत्नी व मुलांसोबत मुंब्रा येथे आपल्या नातलगाकडे गेले होते. जेवण उरकून रात्री साडेअकराच्या सुमारास आपल्या बीएमडब्ल्यू कारने मुंबई येथील आपल्या घरी जात असताना खारीगावच्या अमित गार्डनजवळील सर्व्हिस रोडवर आल्यावर एका अज्ञात दुचाकीवाल्याने गाडीच्या उजव्या बाजूला येऊन रिव्हॉल्वरमधून त्यांच्या अंगावर गोळी झाडली.

गोळी मेहबूब खान यांच्या उजव्या दंडात घुसल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील आरोपी फरारी असून हा हल्ला पूर्ववैमनस्यतून झाला असावा, असा अंदाज कळवा पोलिसांनी व्यक्त केला आहे. या संदर्भात कळवा पोलिसांत अज्ञात हल्लेखोराविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com