ठाण्यात पुन्हा जळीत कांड, शहरात खळबळ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

ठाणे : ठाण्यातील पाचपाखाडी आणि लोकमान्यनगर येथे दुचाकी जळीतकांडची घटना ताजी असतानाच शुक्रवारी सकाळी घोडबदंर येथील पातलीपाडा भागात तीन दुचाकी जळाल्या. या घटनेनंतर मात्र, संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणाचा तपास कासारवडवली पोलिसांकडून सुरू आहे. 

पाचपाखाडी येथे काही दिवसांपूर्वीच 9 दुचाकी जळाल्याची घटना घडली होती. दुचाकी जाळणाऱ्यांनी जुन्या वादातून हा प्रकार केला होता. त्यानंतर, पुन्हा लोकमान्य नगर येथे एका मद्यपीने दुचाकी जाळली होती. त्यात आता, पातलीपाडा येथे एका चाळीत घराजवळ उभ्या केलेल्या तीन दुचाकी जाळण्यात आल्या. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत

Web Title: bikes burned at thane city

टॅग्स