Rapido : बाइक नंतर रॅपिडोची बेकायदा ऑटोरिक्षा टॅक्सी रस्त्यांवर

मुंबईसह राज्यभरात रॅपिडोच्या अ‍ॅप बेस्ड प्रवासी वाहतुकीला अद्याप परिवहन विभागाने परवानगी दिली नाही. त्यानंतरही रॅपिडो बाईक टॅक्सी प्रवासी वाहतूक सुरूच आहे.
rapido autorickshaw taxi
rapido autorickshaw taxisakal
Summary

मुंबईसह राज्यभरात रॅपिडोच्या अ‍ॅप बेस्ड प्रवासी वाहतुकीला अद्याप परिवहन विभागाने परवानगी दिली नाही. त्यानंतरही रॅपिडो बाईक टॅक्सी प्रवासी वाहतूक सुरूच आहे.

मुंबई - मुंबईसह राज्यभरात रॅपिडोच्या अ‍ॅप बेस्ड प्रवासी वाहतुकीला अद्याप परिवहन विभागाने परवानगी दिली नाही. त्यानंतरही रॅपिडो बाईक टॅक्सी प्रवासी वाहतूक सुरूच आहे. रॅपिडोने आता ऑटोरिक्षा मधून प्रवासी वाहतुकीला सुरुवात केली असून, तशा जाहिराती समाजमाध्यमांवर केल्या जात आहे. अ‍ॅपच्या माध्यमातून इच्छूक चालकांची नोंदणी करून बाइक टॅक्सी सेवा धडाक्याने सुरू केली आहे. शिवाय चालकांना आकर्षित करण्यासाठी समाज माध्यमांवर रग्गड कमाईचे आश्वासन मात्र, परिवहन विभागाकडून अशा बेकायदा प्रवासी वाहतुकीवरील कारवाईसाठी दुर्लक्ष केले जात आहे.

बंगळुरुमध्ये गेल्या महिन्यात २५ नोव्हेंबर रोजी एका २३ वर्षीय महिलेवर रॅपिडो बाईक टॅक्सी चालकाने इतर सहकाऱ्यांबरोबर मिळून सामूहिक बलात्कार करण्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली. मात्र, या प्रकरणाच्या तपासात आरोपी असलेल्या बाईक टॅक्सी चालक मुळात गुन्हेगारी प्रवृत्तीचाच असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे बंगळुरू पोलिसांनी बाईक टॅक्सी कंपनी रॅपिडोच्या चालक भरती प्रक्रियेवरच प्रश्न उपस्थित केले होते. शिवाय रॅपिडो कंपनीने संबंधित आरोपीवर गुन्हा नोंद असतानाही पोलिसांकडून नाहरकत प्रमाणपत्र न घेताच त्याला कंपनीत नोकरीवर कसं घेतलं असा प्रश्न उपस्थित केला आहे. मात्र, मुंबईत रॅपिडो बाईक टॅक्सी, ऑटोरिक्षा प्रवासी वाहतुकीबाबत पोलिस प्रशासन आणि परिवहन विभाग गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.

यापूर्वी परिवहन विभागाने आणि वाहतूक पोलिसांनी काही प्रमाणात रॅपिडो कंपनीच्या बाईकवर कारवाई केल्या आहे. मात्र, त्यानंतरही या कंपनीचे मोबाईल एॅप सुरू आहे. दैनंदिन प्रवाशांकडून प्रवासी वाहतुकीसाठी त्याचा वापर केला जात आहे. त्यामूळे मुंबईतील महिला प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आहे.

महाराष्ट्रात अजूनही रॅपिडो कंपनीच्या कोणत्याही प्रवासी वाहतुकीला परवानगी नाही. त्यावर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहे.

- विवेक भिमनवार, आयुक्त, परिवहन विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com