मुंबईत पक्ष्यांवर संक्रांत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जानेवारी 2017

पतंगबाजीमुळे ५०० पेक्षा जास्त पक्षी जखमी 

मुंबई - मांजावर बंदी असली तरीही दोन दिवसांत पतंगबाजीची ओढ पक्ष्यांसाठी जीवघेणी ठरली. दोन दिवसांत मुंबईतील विविध ठिकाणी पक्षी जखमी अवस्थेत सापडल्याने यंदाची मकर संक्रांत पक्ष्यांसाठी घातक ठरल्याची तक्रार पक्षीप्रेमी संस्थांनी केली आहे. दोन दिवसांत तब्बल ५०० हून अधिक पक्षी जखमी झाल्याने मांजाविषयी अद्यापही जनजागृतीचा अभाव असल्याची भावना पक्षीप्रेमींनी व्यक्त केली आहे. 

परळच्या बैलघोडा रुग्णालयात समुद्री गरुडाला जखमी अवस्थेत दाखल करण्यात आले. रुग्णालयाच्या ॲम्बुलन्समध्येही ठिकठिकाणी अनेक पक्ष्यांवर प्राथमिक उपचार करण्यात आले. दोन दिवसांत बैलघोडा रुग्णालयात तब्बल १५० पक्ष्यांवर उपचार करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे सचिव डॉ. सी. खन्ना यांनी दिली. बहुतांश पक्ष्यांची पंखे गळून पडल्याने या पक्ष्यांना पुन्हा भरारी मारता येणार नाही, अशी खंत खन्ना यांनी व्यक्त केली. कबुतरे, घारी, कावळे, कोकीळ, बगळे असे पक्षी रुग्णालयात उपचार घेत आहेत. 

दक्षिण मुंबईत, तसेच पश्‍चिम उपनगरांत बर्ड हेल्पलाईन या पक्षीप्रेमी संस्थेने तब्बल ५०० हून अधिक पक्ष्यांवर उपचार केले. कांदिवली, मालाड व बोरिवली या भागांतून तब्बल २७ कबुतरे मृतावस्थेत बर्डहेल्पलाईनला सापडली. जखमी अवस्थेत सापडणाऱ्या पक्ष्यांमध्ये कबुतरांची संख्या जास्त असल्याची माहिती बर्ड हेल्पलाईनचे संस्थापक हर्ष शाह यांनी दिली. यंदा जखमी पक्ष्यांचे प्रमाण जास्त असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. 

Web Title: bird injured by kite manja

टॅग्स