भाजप कार्यकर्त्यांचा मनसेच्या नगरसेवकावर हल्ला

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

मुंबई- महापालिका निवडणुकीत मुंबईतील प्रभाग क्रमांक 166 मधून निवडून आलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक संतोष तुर्डे यांच्यावर गुरुवारी रात्री प्राणघातक हल्ला झाला. तुर्डे यांच्यासह त्यांचे तीन कार्यकर्ते या हल्ल्यात जखमी झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

राजकीय वैमनस्यातून हा हल्ला झाला असण्याची शक्यता आहे. प्रभागातील भाजपच्या नेत्याने केल्याचा आरोप तुर्डे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. काल रात्री याप्रकरणी भाजपच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.  
याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करीत आहेत. 

तुर्डे यांच्या घराबाहेर गुरुवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास जल्लोष सुरू होता. त्याचवेळी भाजपचे उमेदवार सुधीर खातू आणि त्यांचे समर्थकांनी तुर्डे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर हल्ला चढवला, असे तुर्डे यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. 

Web Title: bjp activists attack mns corporator in mumbai