पनवेल, उरण्णमध्ये भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष Election Result

सकाळ वृत्‍तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

पनवेल : पनवेल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान भाजपा उमेदवार प्रशांत ठाकूर यांनी 16 व्या फेरी अंती प्रतिस्पर्धी शेकाप उमेदवार हरेश केणी यांच्यावर 60 हजारापेक्ष जास्त मतांची आघाडी घेतल्याने भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करायला सुरवात केली आहे. कार्यकर्त्यांकडून भारत माता कि जय,एकच वादा प्रशांत दादा अशा घोषणा दिल्या जात असून,गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतष बाजी केली जात आहे. तसेच उरणमध्ये अठराव्या फेरीअखेर अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी जवळपास १० हजार मतांची आघाडी घेतली असल्‍याने कार्यकर्त्यांकडून जल्‍लाोष करण्यात येत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP activists cheer in Panvel and Uran