Mumbai : गोखले ब्रीजसाठी वलसाड पॅटर्न राबवा, भाजपची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

Mumbai : गोखले ब्रीजसाठी वलसाड पॅटर्न राबवा, भाजपची मागणी

मुंबई : गोखले ब्रीजचे काम हे युद्धपातळीवर व्हावे म्हणून भाजपकडून रेल्वेमंत्र्यांना साकडे घालण्यात आले आहे. गोखले ब्रीजच्या कामासाठी रेल्वे मंत्र्यांनी लक्ष घालून स्थानिकांना दिलासा द्यावा अशी विनंती स्थानिक आमदार अमित साटम यांनी केली आहे. त्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या संपूर्ण प्रकल्पात लक्ष घालावे असेही त्यांनी म्हटले आहे.

रेल्वे मंत्र्यांनी गोखले ब्रीजचे काम हे युद्धपातळीवर होण्यासाठी डीएफसीसीआयएल या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने वलसाड येथे केलेल्या कामाचा दाखला दिला आहे. रोड ओव्हर ब्रीजचे काम वलसाडमध्ये २० दिवसांमध्ये पूर्ण करण्यात आले होते. त्याच धर्तीवर अंधेरीवासीयांसाठी हे काम व्हावे अशी मागणी अमित साटम यांनी केली आहे. रेल्वे मंत्रालयाने मुंबईकरांसाठीही हाच प्रकल्प तातडीने हाती घ्यावा अशी मागणी रेल्वेकडे करण्यात आली आहे.

येत्या शनिवारी बैठक

गोखले ब्रीजच्या निमित्ताने ओशिवरा आणि लोखंडवाला याठिकाणच्या रहिवाशांची बैठक येत्या शनिवारी होणार आहे. त्याठिकाणी स्थानिकांचे म्हणणे एकून घेतानाच या प्रकल्पाच्या निमित्ताने काय काय काम होणार आहे यासाठीची माहिती देण्यात येणार आहे. तसेच पालिका नेमके कोणत्या टप्प्यात काम करणार आहे याचीही माहिती देण्यात येईल.

टॅग्स :Mumbai NewsMumbaiBridge