संजय राऊतांच्या 'त्या' वक्तव्याची भाजपनं उडवली खिल्ली

पूजा विचारे
Tuesday, 18 August 2020

संजय राऊतांच्या वक्तव्यावरुन भाजपनं खिल्ली उडवली आहे. तसंच त्यांच्यावर टीकाही केली आहे. शिव वडापाव झालं. शिवथाळीही झाली आता शिव दवाखाने येणार आहेत, अशी टीका भाजपने शिवसेनेवर केली आहे.

मुंबईः शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी डॉक्टरांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून सध्या चांगलाच वाद सुरु झाला आहे. संजय राऊतांच्या वक्तव्यावरुन भाजपनं खिल्ली उडवली आहे. तसंच त्यांच्यावर टीकाही केली आहे. शिव वडापाव झालं. शिवथाळीही झाली आता शिव दवाखाने येणार आहेत, अशी टीका भाजपने शिवसेनेवर केली आहे. संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद सध्या उमटत असून डॉक्टरांसह डॉक्टरांच्या संघटनांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. 

एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना जागतिक आरोग्य संघटनेला काय कळतं? इकडून तिकडून गोळा केलेले लोक तिथं आहेत. मी कधीही डॉक्टरकडून औषध घेत नाही कंपाऊंडरकडून घेतो, त्याला जास्त कळतं, असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करून ही टीका केली आहे.

शिव वडापाव आणि थाळीच्या घवघवीत यशानंतर आता येत आहेत शिव दवाखाने. इथे डॉक्टरांच्या ऐवजी कंपाऊंडर असतील, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे. 

राऊतांच्या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला असून मार्डने राऊत यांनी माफी मागण्याची मागणी केली आहे. मार्डने याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नाराजीही व्यक्त केली आहे. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन राऊतांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

हेही वाचाः जितेंद्र आव्हाड धावले संजय राऊतांसाठी, टीकाकारांना दिलं 'असं' उत्तर

माझ्याकडून डॉक्टरांचा अपमान झालेला नाही. माझी तशी भावनाही नव्हती. अपमान आणि कोटी यांच्यातील फरक जाणून घेतला पाहिजे. अशाप्रकारच्या कोट्या राजकारणात होतात, वकिलांवरही होतात. कोट्या पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा इतर कुणावरही होतात. बोलण्याच्या ओघात माझ्याकडून एखादी कोटी झाली. खरंतर त्याचं कौतुक केलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

तसंच मी काय बोललो आहे हे समजून न घेता काही राजकीय मंडळी काही मोहीम चालवणार असतील तर त्याला थारा देणार नाही. मी डॉक्टरांचा अपमान केलेला नसून माझ्याकडून बोलण्याच्या ओघात एखादी कोटी निघून गेली त्याचं कौतुक डॉक्टरांनी केलं पाहिजे. डॉक्टरांची ताकद एवढी अफाट आणि अचाट असते. की त्यांनी कंपाऊंडर घडवले आहेत. हे कौतुक आहे, याचा सन्मान झाला पाहिजे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचाः  गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी २ हजार ऑनलाइन नोंदणी, मात्र असेल 'ही' अट

जागतिक आरोग्य संघटना ही राजकीय संघटना झाली आहे. हे माझंच नाही तर अनेक देशांचं म्हणणं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीरपणे त्यांना फटाकलं आहे. संबंधही तोडलेत. कारण तिथे डॉक्टर कमी आणि राजकारणी जास्त झाले आहेत. कोरोनाचा फैलाव होण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना जबाबदार असल्याचं अनेक देशांनी म्हटलं आहे. येथील डॉक्टरांना ते विधान गांभीर्याचं घेण्याची गरज नसल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे.

bjp attack sanjay raut controversial statement doctor remarks


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp attack sanjay raut controversial statement doctor remarks