वेंकय्या नायडू, गडकरी, रूपाला यांच्या मुंबईत सभा 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

नायडू यांची सोमवारी (ता. 13) तर गडकरी यांची शुक्रवारी (ता. 16) प्रचार सभा होणार आहेत. भाजपचे खासदार व अभिनेते मनोज तिवारी यांच्या सभा मंगळवारी (ता. 14) आणि गुरुवारी (ता. 15) होणार आहेत.

मुंबई - पारदर्शकता आणि विकास या दोन्ही मुद्द्यांवर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपचे अध्यक्ष ऍड. आशिष शेलार यांनी संयमी प्रचाराने रान उठवले असताना आता केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू, महामार्ग आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पंचायत राजचे राज्यमंत्री पुरुषोत्तम रूपाला हेही प्रचारासाठी मुंबईत दाखल होत आहेत. 

नायडू यांची सोमवारी (ता. 13) तर गडकरी यांची शुक्रवारी (ता. 16) प्रचार सभा होणार आहेत. भाजपचे खासदार व अभिनेते मनोज तिवारी यांच्या सभा मंगळवारी (ता. 14) आणि गुरुवारी (ता. 15) होणार आहेत. 

या नेत्यांच्या जोडीने राज्यातील प्रमुख भाजप नेत्यांची कुमकही प्रचारात उतरली आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, बालकल्याण व महिला विकास मंत्री पंकजा मुंडे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याही येत्या काही दिवसांत मुंबईत विविध ठिकाणी प्रचार सभा होणार आहेत. प्रचारादरम्यान भाजप नेत्यांच्या जाहीर सभांबरोबर आशिष शेलार यांचे रोड शो व सभा विविध भागांत होणार आहेत. 

Web Title: bjp campaigning in mumbai