भाजप-कॉंग्रेस नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

मुंबई - भाजप आमदार अमित साटम यांनी महापालिका अधिकाऱ्याला केलेल्या कथित शिवीगाळ प्रकरणावरून कॉंग्रेस आणि भाजप नगरसेवकांदरम्यान बुधवारी मुंबई महापालिकेच्या महासभेत शाब्दिक चकमक झाली.

आमदार साटम यांनी शिवीगाळ केलेली नसल्याचे लेखी पत्र संबंधित अधिकाऱ्याने दिले असल्याचा दावा भाजप नगरसेवकांनी केला; तर धमकावल्यावर कोणीही असे पत्र देऊ शकते, असा आरोप कॉंग्रेस नगरसेवकांनी केला. 

साटम हे महापालिकेच्या अभियंत्याला फोनवरून शिवीगाळ करत असल्याचा ऑडिओ व्हायरल झाल्यावर भाजपवर जोरदार टीका झाली होती. भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी बुधवारी झालेल्या महासभेत हरकतीचा मुद्दा उपस्थित करत कनिष्ठ अभियंता जितेंद्र राठोड यांनी दिलेल्या पत्राकडे लक्ष वेधले. साटम यांनी आपल्याला अर्वाच्च भाषा वापरल्याचे मला आठवत नसल्याचे या पत्रात राठोड यांनी नमूद केले आहे. त्यामुळे साटम यांनी शिवीगाळ केली नसल्याचे सिद्ध होते; पण पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी गेल्या आठवड्यात झालेल्या महासभेत साटम यांच्यावर आरोप केले. तथ्य नसलेल्या कारणासाठी सभागृहाचा वेळ घेतला. त्यामुळे राजा यांनी सभागृहाची माफी मागावी, अशी मागणी कोटक यांनी केली. त्यावर कोटक यांनी मला सल्ला देऊ नये. काय बोलावे, काय बोलू नये, हे मला चांगले ठाऊक आहे. केवळ आपणच हुशार असल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांना वाटते, ते योग्य नाही. अधिकाऱ्यांना धमकावून कोणीही पत्र आणू शकते. त्यामुळे या पत्राची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्याने दबावापोटी पत्र दिले आहे का, याची चौकशी करावी, अशी मागणीही राजा यांनी केली. त्यानंतर महापौर विश्‍वनाथ महाडेश्वर यांनी कोटक यांचा हरकतीचा मुद्दा फेटाळत या वादावर पडदा टाकला. 

Web Title: BJP-Congress corporators mumbai