भाजपच्या नगरसेविका लोंढे अपघातात ठार; महिला जिल्हाध्यक्षा जखमी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

पनवेल महापालिकेतील भाजपच्या नगरसेविका मुग्धा लोंढे यांचा आज (गुरुवार) अपघाती मृत्यू झाला. या अपघातात रायगड जिल्हा महिला भाजप अध्यक्षा कल्पना राऊत यादेखील गंभीर जखमी झाल्या आहेत.

पनवेल : पनवेल महापालिकेतील भाजपच्या नगरसेविका मुग्धा लोंढे यांचा आज (गुरुवार) अपघाती मृत्यू झाला. या अपघातात रायगड जिल्हा महिला भाजप अध्यक्षा कल्पना राऊत यादेखील गंभीर जखमी झाल्या आहेत. रस्त्याच्या कडेला उभ्या असताना स्विफ्टने मुग्धा लोंढे यांना धडक दिली. यामध्ये त्या जागीच ठार झाल्या. 

रस्त्याच्या कडेला उभ्या असताना अर्धवट कॉँक्रिटीकरण कामामुळे स्विफ्ट अडकली होती. ही गाडी काढताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या या दोघींच्या अंगावर ही कार वेगाने गेली. त्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात मुग्धा लोंढे जागीच ठार झाल्या. तर राऊत जखमी झाल्या. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमदार प्रशांत ठाकूर, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Corporater Mugdha Londhe died in accident