पालिकेची नालेसफाई ऐवजी हातसफाई! नालेसफाईचा दावा 200 टक्के खोटा; भाजपची टीका... 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 14 June 2020

पावसाळ्यात मुंबईत प्रचंड पाणी तुंबतं त्यामुळे खबरदारी म्हणून महापालिकेनं नालेसफाईचं काम हाती घेतलं होतं. मात्र विरोधी पक्ष भाजपनं नेहमीच या कामावर ताशेरे ओढले आहेत. आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेच्या नालेसफाईच्या कामावर टीका केली आहे.    

मुंबई : पावसाळ्यात मुंबईत प्रचंड पाणी तुंबतं त्यामुळे खबरदारी म्हणून महापालिकेनं नालेसफाईचं काम हाती घेतलं होतं. मात्र विरोधी पक्ष भाजपनं नेहमीच या कामावर ताशेरे ओढले आहेत. आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेच्या नालेसफाईच्या कामावर टीका केली आहे.    

 हेही वाचा:आज अंकिता लोखंडेनं ठेवलं होतं 'हे' स्टेटस..वाचा संपूर्ण बातमी .

113 टक्के नालेसफाईचा महापालिकेने केलेला दावा 227 टक्के खोटा आहे. टेंडर पासून सफाईपर्यत आकडेवारीची हातसफाई वर्षानुवर्ष सुरु आहे, असा आरोप माजी शिक्षणमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी केला. ही नाले सफाई नसून हातसफाई आहे असा टोलाही त्यांनी लगावला. 

मुंबईत यंदा 113 टक्के नालेसफाई झाली असल्यादा प्रशासनाकडून केला जात आहे.मात्र,40 टक्क्यांपेक्षा जास्त नाले सफाई झालेली नसल्यादावा अॅड.शेलार यांनी केला.

पालिकेकडून दरवर्षीच आकडेवारीचा डोंगर उभा केला जातो.आयुक्त मोठमोठे दावे करतात. पण ते पहिल्याच पावसात वाहून जातात असा आरोपही त्यांनी केला. 

हेही वाचा: कोरोना चाचणी शिवाय 'नो एन्ट्री'; गावी अडकलेल्या रहिवाशांसाठी सोसायटयांनी काढला फतवा..  

आयुक्त इक्बाल सिंह चहल जर 113 टक्के नाले सफाई झाल्याचा दावा करत असतील गाळ कोठे टाकला,वजन काट्यांची आकडेवारी का जाहीर करत नाहीत. सीसीटीव्हीचे फुटेज का जाहीर करत नाहीत असे प्रश्नही आमदार शेलार यांनी उपस्थित केले.

BJP criticize shivsena on drain cleaning work 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP criticize shivsena on drain cleaning work