'उद्धव ठाकरे कुठे आहे आपला चमत्कार'?; नोटापेक्षाही कमी मते मिळाल्याने भाजपकडून खिल्ली

तुषार सोनवणे
Wednesday, 11 November 2020

या निवडणूाकीकडे लक्ष ठेऊन असलेल्या व बिहारमध्ये 23 जागा लढवणाऱ्या शिवसेनेला एका टक्यापेक्षाही कमी मते मिळाल्याने त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. 

मुंबई - बिहार विधानसभा निवडणूकीच्या निकालाकडे मंगळवारी साऱ्या देशाचे लक्ष लागले होते. या निवडणूकीत सत्ताधारी जनता दल (यु) आणि भाजपचला पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी जनतेने कौल दिला आहे. परंतु या निवडणूाकीकडे लक्ष ठेऊन असलेल्या व बिहारमध्ये 23 जागा लढवणाऱ्या शिवसेनेला एका टक्यापेक्षाही कमी मते मिळाल्याने त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. 

कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत केवळ एका रुग्णाची भर

लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात 75 आमदार निवडून आणत जोरदार मुसंडी मारली. परंतु राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएतील जेडीयु आणि भाजपच्या झंझावतासमोर त्यांचा टिकाव लागला नाही. एनडीएला 125 जागा मिळाल्या आहेत. परंतु एनडीतून बाहेर पडलेल्या आणि महाराष्ट्रात सत्तेपासून भाजपला दूर ठेवणाऱ्या शिवसेनेने 23 जागा बिहार मध्ये लढवल्या होत्या. शिवसेनेला फक्त 0.05 मते मिळाली आहेत. ही टक्केवारी 'नोटा' ला मिळालेल्या मतांपेक्षाही कमी आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेवर टीका करण्याची संधी सोडणार नाही. भाजपनेते किरिट सोमय्या यांनी शिवसेनेवर टीका करत एक ट्वीट केले आहे त्यात ते म्हणतात की, ''बिहार मे चमत्कार की, बाते करनेवाली शिवसेना का डिपॉझिट गायब! एक टक्का व्होटभी नही मिले. बिहारमधे शिवसेनेचे डीपोझिट गुल. 1% व्होट्स पण नाही. श्री उध्दव ठाकरे आणि श्री संजय राऊत कुठे आहे आपला चमत्कार?

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य करण्यात आलं आहे. तो शब्द पाळला गेला नाही व महाराष्ट्रात नवे राजकीय महाभारत घडले. आता कमी जागा मिळूनही नितीशकुमारांना दिलेला शब्द पाळला गेला तर त्याचे श्रेय शिवसेनेला द्यावे लागेल. बिहारात नेमके काय होईल? ते पुढच्या 72 तासांत स्पष्ट होईल,  असा टोला सामना अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

--


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP criticizes Shiv Sena for getting very few votes in Bihar