पराभूत उमेदवारांच्या बैठकीला पंकजा मुंडेंची दांडी; काय असेल कारण?

टीम ई-सकाळ
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

बड्या नेत्यांच्या पराभवाच्या कारणांवर या बैठकीत चर्चा झाली तसेच मतदारसंघ निहाय कारणांचाही आढावा घेण्यात आला. पण, पंकजा मुंडे यांच्या अनुपस्थितीमुळे परळीतील पराभवाची कारणे काय? याची पक्षाच्या बैठकीत चर्चाच झाली नाही. 

मुंबई : सत्ता स्थापनेच्या स्पर्धेतून भाजप बाहेर पडल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून भाजप नेत्यांच्या साखळी बैठका सुरू आहेत. राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्याबरोबरच ज्या जागांवर पराभव झाला त्याची कारणामिमांसाही करण्यात येत आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

पंकजा मुंडे आहेत कुठं?
राज्यातील आज पराभूत भाजप उमेदवारांची बैठक झाली. या बैठकीला परळी विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे अनुपस्थित होत्या. त्यांच्या अनुपस्थितीची सध्या भाजपच्या वर्तुळात चर्चा सुरू आहे. पंकजा मुंडे यांचा बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघात पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पंकजा मुंडे यांचे भाऊ धनंजय मुंडे यांनी त्याचा पराभव केला होता. पराभवानंतर आजच्या बैठकीला पंकजा मुंडे अनुपस्थित होत्या. राज्यातील नेत्यांच्या बैठका तसेच राज्यपालांच्या भेटीला जाताना पंकजा मुंडे भाजप नेत्यांसोबत दिसल्या होत्या. पण, आजच्या बैठकीला त्या का अनुपस्थित राहिल्या? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

भाजपचे 15 ते 20 आमदार आमच्या संपर्कात : जयंत पाटील

स्मृती इराणींनी केला तलवार डान्स, सगळे बघतच राहिले

परळीच्या पराभवाच्या कारणांचं काय?
बैठकीला चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे,  व्ही. सतीश, विजय पुराणिक यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. माजी मंत्री अनिल बोंडे, राम शिंदे यांच्यासह वैभव पिचड, हर्षवर्धन पाटील, मोनिका रांजळे बैठकीला उपस्थित होते. या बड्या नेत्यांच्या पराभवाच्या कारणांवर या बैठकीत चर्चा झाली तसेच मतदारसंघ निहाय कारणांचाही आढावा घेण्यात आला. पण, पंकजा मुंडे यांच्या अनुपस्थितीमुळे परळीतील पराभवाची कारणे काय? याची पक्षाच्या बैठकीत चर्चाच झाली नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp defeated candidate meeting maharashtra pankaja munde absent