भाजपच्या जिल्हा शाखा दुष्काळाचा आढावा घेणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मे 2019

भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी राज्यातील दुष्काळ असलेल्या जिल्ह्यांतील चारा छावण्यांना भेट देतील आणि भाजपची प्रत्येक जिल्हा शाखा दुष्काळग्रस्त भागात सेवाकार्य करेल, असा निर्णय मंगळवारी पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला. या वेळी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.

मुंबई - भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी राज्यातील दुष्काळ असलेल्या जिल्ह्यांतील चारा छावण्यांना भेट देतील आणि भाजपची प्रत्येक जिल्हा शाखा दुष्काळग्रस्त भागात सेवाकार्य करेल, असा निर्णय मंगळवारी पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला. या वेळी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपची बैठक मुंबईत झाली. बैठकीतील निर्णयांची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांना दिली. या वेळी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व प्रदेश सरचिटणीस आमदार अतुल भातखळकर उपस्थित होते.

मुनगंटीवार म्हणाले, की लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी भाजपचे खासदार, आमदार, लोकसभा उमेदवार, पदाधिकारी, जिल्हाध्यक्षांची बैठक झाली. या बैठकीत राज्यातील दुष्काळी स्थितीवर प्रामुख्याने चर्चा झाली. भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी दुष्काळी भागाला भेट देणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP district branch will review the drought