आश्चर्यच! भाजपचा माजी आमदार राष्ट्रवादीत

NCP
NCP

नागपूर : सध्या भाजप आणि शिवसेनेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आजी-माजी आमदारांचा जोरदार प्रवेश होत असताना, चक्क नागपूरमधील हिंगणा मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार विजय पांडुरंग घोटमारे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

घोटमारे यांनी मुंबई येथील प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये घड्याळ हाती घेऊन पक्ष प्रवेश केला. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि पक्ष जी काही जबाबदारी माझ्यावर टाकेल, ती मी प्रामाणिकपणानं निभावेल, अशा शब्दात विजय घोटमारे यानी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी मंत्री रमेश बंब, कार्याध्यक्ष नागपूर ग्रामीण राजू राऊत तसेच प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ ताकसांडे उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठे नेते एकापाठोपाठ भाजपमध्ये जात असताना उपराजधानीत मात्र उलटी गंगा वाहत असल्याचे बघायला मिळाले. विजय घोटमारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री रमेश बंग यांची नुकतीच भेट घेतली होती. 2009 मध्ये घोटमारे भाजपकडून निवडून आले होते. तरीही 2014 मध्ये मात्र पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून त्यांना थांबण्यासाठी सांगण्यात आले होते. त्यावेळी त्यांना विधानपरीषदेचे आश्‍वासनही देण्यात आले होते. पण,  ते पाळले गेले नाही आणि यावेळी सुद्धा भाजपकडून उमेदवारी मिळण्याची कुठलीही शक्‍यता नाही. त्यामुळे घोडमारेंनी हे पाऊल उचलले असावे, अशी शक्‍यता राजकीय वर्तुळात वर्तविण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com