मुंबईत 120 जागांसाठी भाजपकडून नावे निश्‍चित

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जानेवारी 2017

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आज झालेल्या बैठकीत मुंबईतील तीन जिल्ह्यांतील सुमारे 120 उमेदवारांची अंतिम यादी तयार करण्यात आली असून, उर्वरित उमेदवारांच्या नावांवर लवकरच शिक्कामोर्तब होणार असल्याचे मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी सांगितले.

भाजपची निवडणूक तयारी जोरदार सुरू असून, या संपूर्ण प्रक्रियेवर स्वतः मुख्यमंत्री लक्ष ठेवून आहेत. मागील आठवड्यात झालेल्या निवडणूक समितीच्या बैठकीत 527 जणांच्या नावांची यादी तयार करण्यात आली होती. त्याला आता अंतिम स्वरूप देण्यात येत आहे.

Web Title: bjp fixes 120 candidates in mumbai