भाजपला पडला सावरकरांचा विसर ... राष्ट्रपुरुषांच्या यादीतून नाव वगळलं.. 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020

मुंबई: स्वातंत्र्यवीर सावरकरांना 'भारतरत्न' प्रदान करावं अशी मागणी सतत करणाऱ्या भाजपनंच आता सावरकरांचा अपमान केला. फडणवीस सरकारच्या काळातल्या राष्ट्रपुरुषांच्या यादीमध्ये सावरकरांचं नावंच नाही अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे सावरकरांच्या भारतरत्नसाठी मागणी करणारा भाजप चांगलाच तोंडघशी पडला आहे. 

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांना 'भारतरत्न' प्रदान करावं अशी मागणी सतत करणाऱ्या भाजपनंच आता सावरकरांचा अपमान केला. फडणवीस सरकारच्या काळातल्या राष्ट्रपुरुषांच्या यादीमध्ये सावरकरांचं नावंच नाही अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे सावरकरांच्या भारतरत्नसाठी मागणी करणारा भाजप चांगलाच तोंडघशी पडला आहे असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. 

हेही वाचा: झालं असं काही..! पाचशे कोटींची कमाई!

मुख्यमत्र्यांच्या सामान्य प्रशासन विभागाकडून राष्ट्रपुरुष आणि थोर पुरुष यांची यादी जाहीर होत असते. त्यांची छायाचित्रं मुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री आणि सगळया शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये लावणं बंधनकारक आहे. मात्र सावरकरांचं नाव या यादीतच नाहीये. राष्ट्रपुरुषांच्या यादीतच नाव नसल्यामुळे सावरकरांची तसबीर शासकीय कार्यालयांच्या भिंतीवर लावण्यातच आली नाहीये.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याच काळात झालेल्या या प्रकाराबद्दल त्यांची चूक झाल्याचं मान्य केली आहे. मात्र सावरकरांचं नाव यादीत सामिल करून घेण्याबाबत ठाकरे सरकारलाच सुनावलं आहे. 

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस: 

"राष्ट्रपुरुषांच्या यादीत स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव असायलाच पाहिजे. आमच्या सरकारच्या काळात ते चुकून राहिलं असेल, तर या सरकारने ताबडतोब ही चूक दुरुस्त करावी", अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिलीये.

हेही वाचा: फडणवीसांच्या काळात सिडकोत अडीच हजार कोटींचा घोटाळा....

"स्वातंत्र्यवीर सावरकरांना 'भारतरत्न' देण्यासाठी भाजपनं किती पत्र पाठवली", असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपला विचारला आहे. भाजप-शिवसेना सरकारमध्ये दोन्ही सत्ताधारी पक्षांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी उचलून धरली होती. मात्र युती तुटल्यानंतर शिवसेनेनं  काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी केली. सावरकरांना भारतरत्न मिळण्याबाबत कॉंग्रेस अनुकूल नाहीये. त्यामुळे कॉँग्रेससोबत गेलेल्या शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न भाजप करताना दिसतंय.

त्यामुळे इतके दिवस सावरकरांना देशाचा सर्वोच्च सन्मान मिळावा म्हणून जीवाचा आटापिटा करून लढणारी भाजपच सावरकरांना राष्ट्रपुरुष मानत नाही का असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

BJP forgot to include veer savarkar name in patriarchs list   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP forgot to include veer savarkar name in patriarchs list