भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या पत्नीच्या शैक्षणिक संस्थेला कोट्यवधींचा दंड

97 लाख रुपये थकित मुद्रांक शुल्कासह 2 टक्के प्रतिमाह दंड रक्कम भरण्याची बजावली नोटीस.
भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या पत्नीच्या शैक्षणिक संस्थेला कोट्यवधींचा दंड

विरार: भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता (Bjp former mla narendra mehta) यांच्या पत्नी सुमन यांच्या सेव्हन इलेव्हन एज्युकेशन सोसायटीला (seven eleven education institute) ९७ लाख ४० हजार थकीत मुद्रांक शुल्क व त्यावर 2008 साला पासून प्रतिमाह 2 टक्के प्रमाणे दंड 21 ऑगस्ट पर्यंत भरण्याची नोटीस मुद्रांक जिल्हाधिकारी ठाणे यांनी बजावली आहे. दंडासह ही रक्कम काही कोटीत आहे. मीरा-भाईंदर भाजप म्हणजेच नरेंद्र मेहता असे समीकरण विधानसभा निवडणुकी पूर्वी होते. परंतु निवडणुकीत मेहता यांचा पराभव झाल्यानंतर मात्र मेहता यांची एकेक प्रकरणे आता बाहेर येऊ लागली आहेत.

मीरारोड पूर्वेला सेव्हन स्क्वेअर अकादमी ही शाळा आहे. सदर जमीन व शाळा इमारत ही भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन कंस्ट्रक्शन कंपनी कडून त्यांची पत्नी सुमन मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन एज्युकेशन सोसायटीने 2008 साली 30 वर्षाच्या नाममात्र भाडेपट्ट्याने घेतली. भाडेकरार करताना नियमानुसार नोंदणी व मुद्रांक शुल्क भरण्यात आला नसल्याने शासनाचा महसूल बुडवून फसवणूक केल्या प्रकरणी फौजदारी कारवाई करावी आणि मुद्रांक शुल्क दंडासह वसूल करावे अशा तक्रारी 2013 साला पासून केल्या जात होत्या.

भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या पत्नीच्या शैक्षणिक संस्थेला कोट्यवधींचा दंड
कोविड लसींच्या तुटवड्यामुळे मुंबईत उद्या लसीकरण बंद !

ठाणे शहरचे प्रभारी मुद्रांक जिल्हाधिकारी तानाजी गंगावणे यांनी 23 जुलै रोजीच्या तारखेची नोटीस सेव्हन इलेव्हन एज्युकेशन सोसायटीच्या सुमन मेहता यांना बजावली आहे. सदर नोटीस मध्ये या बाबत 2014 साली तक्रार झाली होती. 10 नोव्हेंबर 2016 रोजी सुनावणी नोटीस बजावण्यात आली होती. 26 ऑक्टोबर 2020 रोजी अंतिम आदेश देण्यात आला होता. 9926 चौ मी जमीन क्षेत्रातील एकूण 78 हजार चौ मी ची शाळा इमारत आहे.

भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या पत्नीच्या शैक्षणिक संस्थेला कोट्यवधींचा दंड
मुंबई विमानतळावर पुन्हा लागणार शिवाजी महाराजांच्या नावाचा बोर्ड

त्याचे मुद्रांक शुल्क 97 लाख 40 हजार 100 रुपये इतके भरण्यात आले नव्हते. सदर मुद्रांक शुल्क सहदस्त केल्याच्या तारखेपासून प्रतिमाह 2 टक्के प्रमाणे दंड अशी रक्कम नोटीस बजावल्याच्या तारखे पासून 30 दिवसात भरावी. रक्कम भरली नाही तर सक्तीच्या कारवाईचा इशारा मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी नोटीस मध्ये दिला आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com