भाजपचे कल्याणमध्ये एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

रविंद्र खरात
गुरुवार, 12 एप्रिल 2018

कल्याण : संसदेच्या अर्थसंकल्प अधिवेशनाचा दुसरा टप्पा संपूर्णपणे गदारोळात वाया गेला. त्यासाठी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांना जबाबदार ठरवीत त्यांचा निषेध करत आज गुरुवारी (ता. 12) भाजपने एक दिवसीय देशव्यापी आंदोलन केले. कल्याण मधील शिवाजी चौकामध्ये आमदार गणपत गायकवाड आणि आमदार नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्ते, नगरसेवक, पदाधिकारी यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले.

नुकत्याच झालेल्या संसदेच्या अर्थसंकल्प अधिवेशनात काँग्रेस सहित विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहात गोंधळ घातल्याने अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात व्यत्यय निर्माण झाला. देशाची प्रगती खुंटत आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशावरून विरोधकांनी 23 दिवस अधिवेशन चालू न दिल्याने भाजपच्या सर्व खासदारांनी देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात उपोषण करण्याचे आदेश दिले होते, भाजप खासदारांनी या 23 दिवसांच्या कालावधीतील मानधन सरकारकडे जमा केले आहे. विरोधकांच्या या एकाधिकारशाहीचा निषेध करण्यासाठी आज गुरुवारी (ता. 12) देशव्यापी आंदोलन झाले त्यात कल्याण मधील शिवाजी चौकात भाजपाच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

या उपोषणात आमदार गणपत गायकवाड, आमदार नरेंद्र पवार यांच्या सहस्थायी समिती सभापती राहुल दामले, उपमहापौर मोरेश्वर भोईर, नगरसेविका रेखा चौधरी, उपेक्षा भोईर आदिंसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.

कल्याण पश्चिम मधील शिवाजी चौकात फुटपाथवर मंडप टाकून आंदोलन होतात मात्र आज भाजपाने फुटपाथ ऐवजी रस्त्यावर मंडप टाकुन आंदोलन झाल्याने आजू बाजूला दुचाकी आणि अन्य वाहन पार्क झाल्याने दिवस भर वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला तर अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी वर्गाने या आंदोलनाला पाठ फिरवल्याने  त्यांच्यावर पक्ष काय कारवाई करते याकडे लक्ष्य लागले आहे.

Web Title: bjp is on hunger strike in kalyan