भाजपची स्वबळावर सत्ता येणार नाही - खासदार संजय राऊत

संजय मिस्कीन
गुरुवार, 17 मे 2018

मुंबई - कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालानंतर भारतीय जनता पक्ष केंद्रातील सत्तेचा वापर करत आहे. यापूर्वी गोवा व मणिपूरमध्ये जे केले तेच कर्नाटकमध्ये होईल. मात्र, याचे पडसाद देशभरात उमटतील, असे स्पष्ट करत, 2019 मध्ये भाजपची केंद्रातदेखील स्वबळावर सत्ता येणार नाही, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

'कर्नाटकात भाजप सर्वांत मोठा पक्ष असला तरी कॉंग्रेस व धर्मनिरपेक्ष जनता दल यांची आघाडी झाली आहे. त्यामुळे बहुमताचा आकडा कॉंग्रेस आघाडीकडे आहे. मात्र, कर्नाटकचे राज्यपाल हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहेत. कोणत्याही परिस्थितीत ते कॉंग्रेसला सत्तेत येऊ देणार नाहीत,'' असेही संजय राऊत म्हणाले. केंद्रातील सत्तेच्या बळावर भाजपने या अगोदर गोवा, मणिपूरमध्ये कॉंग्रेस सर्वांत मोठा पक्ष असतानाही त्याला सत्तेबाहेर ठेवण्यात यश मिळवले. आता कर्नाटकात बहुमत नसतानाही धाकदडपशाही करून भाजप सत्ता स्थापन करेल. त्याला राज्यपाल पाठबळ देतील, असेही ते म्हणाले.

सध्या शिवसेना भाजप बरोबर सत्तेत असली तरी कॉंग्रेसच्याबाबत शिवसेनेत सहानुभूतीचे वातावरण अधिक दिसत आहे. त्यातच पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेने उमेदवारी देत भाजपची कोंडी केली आहे. यामुळे आगामी काळात भाजप व शिवसेना हा राजकीय संघर्ष टोकाला पोचण्याची शक्‍यता आहे.

Web Title: BJP karnataka sanjay raut politics