भाजपच्या आशिष शेलारांकडून उद्धव ठाकरेंच्या सुपुत्राच्या पाठीवर कौतुकाची थाप; म्हणालेत, "काम महाराष्ट्राची मान उंचावणारे आहे! ग्रेट!"

सुमित बागुल
Saturday, 17 October 2020

तेजस ठाकरे यांनी या आधीही विविध प्रजातींचे शोध लावलेत. नुकतीच त्यांनी पालींच्या एका दुर्मिळ प्रजातीचा देखील शोध लावला होता. खेकड्यांच्या प्रजातींचा देखील शोध तेजस यांनी लावलाय.

मुंबई : शिवसेना आणि भाजप, एकेकाळच्या मित्रांमध्ये सध्या कोणतीही गोष्ट म्हंटली तरी विस्तवही जात नाही. पण शिवसेनेवर, त्यांच्या राजकारणावर कायम टीका करणाऱ्या भाजपच्या आशिष शेलार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सुपुत्राचं तोंडभरून कौतुक केलंय. उद्धव ठाकरे यांच्या सुपुत्राने महाराष्ट्राची मान उंचावली असल्याचं ट्विट आशिष शेलार यांनी केलंय.

तेजस ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे धाकटे पुत्र. तेजस ठाकरे यांनी नुकतीच सोनेरी केसाच्या माशाची चौथी ‘हिरण्यकेशी’ प्रजाती शोधली. याच गोष्टीवरून भाजप आमदार, नेते, ऍडव्होकेट आशिष शेलार यांनी तेजस ठाकरे यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिलीये 

आशिष शेलार यांचं ट्विट : 

 

तेजस ठाकरे यांनी या आधीही विविध प्रजातींचे शोध लावलेत. नुकतीच त्यांनी पालींच्या एका दुर्मिळ प्रजातीचा देखील शोध लावला होता. खेकड्यांच्या प्रजातींचा देखील शोध तेजस यांनी लावलाय. दरम्यान आता तेजस ठाकरे यांनी आंबोली गावातील हिरण्यकश नदीमध्ये सोनेरी केसाच्या माशाची २० वी प्रजाती शोधून काढलीये. ही प्रजाती हिरण्यकश नदीत सापडल्यामुळे या प्रजातीचं नाव हिरण्यकेशी असं ठेवण्यात आलंय. हिरण्यकेशी म्हणजेच सोनेरी रंगाचा केस. तेजस ठाकरे यांच्या या संशोधनाबाबतचे लेख विविध महत्त्वाच्या मासिकांमध्ये छापून आलेले आहेत. डॉक्टर प्रवीणराज जयसिन्हा यांच्या नेतृत्वात तेजस यांनी हे संशोधन केलं आहे.  

bjp leader and mla ashish shelar congratulate son of uddhav thackeray tejas


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp leader and mla ashish shelar congratulate son of uddhav thackeray tejas