संजय राऊत यांनी कमी बोलावे : आशिष शेलार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

शिवसेना नेते संजय राऊत हे आमचे मित्र आहेत. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मी आलो होते. त्यांनी कमी बोलावे असे डॉक्टरांचे  म्हणणे आहे, त्यामुळे आमचीही हीच अपेक्षा आहे.

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत हे आमचे मित्र आहेत. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मी आलो होते. त्यांनी कमी बोलावे असे डॉक्टरांचे  म्हणणे आहे, त्यामुळे आमचीही हीच अपेक्षा आहे, असे भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

आज (रविवारी) सकाळी लिलावती रूग्णालयाच्या बेडवर अँजिओप्लास्टी झालेले संजय राऊत चक्क सामनासाठी संपादकीय लिहिताना दिसले. काल शरिरावर इतकी मोठी शस्त्रक्रिया होऊनही हिंमत न हारता त्यांनी आज संपादकीय लिहिले.

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसच जुळणार; राष्ट्रपती राजवट लागली तरीही...

लिलावती रूग्णालयात राऊतांची अँजिओप्लास्टी झाली. त्यात दोन ब्लॉकेज आढळून आल्याने डॉक्टरांनी लगेच अँजिओग्राफी करण्याचा निर्णय घेतला. आता राऊतांची तब्येत बरी असून लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळेल. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी प्रमुख नेते येत आहेत. आशिष शेलारही त्यांच्या भेटीसाठी आले होते आणि यावेळी यांच्यात चर्चा झाली.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

आशिष शेलार म्हणाले, की आपल्या महाराष्ट्राची ही परंपरा आहे. आमचे मित्र संजय राऊत हे सामनाचे संपादक आहेत. त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी मी आलो होते. डॉक्टरांनी त्यांना कमी बोलण्याचा सल्ला दिला असून, आमचेही तेच म्हणणे आहे.

निर्णय न झाल्याने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट अटळ?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leader Ashish Shelar advice to Shivsena MP Sanjay Raut for health condition