राजभवनाकडे तोंड करुन उगाच बोंबा का मारताय? शेलारांचा राऊत यांना सवाल

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 April 2020

घटनात्मक महत्त्वचे पद असणाऱ्या महामहिम राज्यपालांच्या राजभवनाकडे बघून का बोंबा मारताय? असा  सवाल भाजपचे माजी शिक्षण मंत्री आमदार अँड आशिष शेलार यांनी केला आहे.

मुंबई : घटनात्मक महत्त्वचे पद असणाऱ्या महामहिम राज्यपालांच्या राजभवनाकडे बघून का बोंबा मारताय? असा  सवाल भाजपचे माजी शिक्षण मंत्री आमदार अँड आशिष शेलार यांनी केला आहे.

राज्यपाल यांच्याबाबत  शिवसेना खासदार संजय राऊत यांनी  एक व्टिट केले होते. यास उत्तर देताना शेलार यांनी म्हटले आहे की,  राजभवनाकडे तोंड करुन काल पत्रपंडित काहीतरी बोलले म्हणे!काय होतं ते ? तुम्ही जेव्हा दोन नावे मित्र पक्षाची सूचविली त्यावेळी मुख्यमंत्र्यांचे नाव राज्यपालांना का सुचवले नाही? यवतमाळच्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्र्यांना का उमेदवारी दिली गेली नाही? आपण हे विसरलो. हे आता सांगायचे आहे की, राज्यपालांवर आता दबाव आणायचा आहे? इथे पत्रपंडित बोलायला लागले की, डरावडराव करणाऱ्या प्राण्याची आठवण होते.समजनेवाले को इशारा काफी है..

संजय राऊतांच ट्विट, म्हणतायत "राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये"

 

धक्कादायक ! तुम्हा आम्हाला रात्रंदिवस बातम्या देणारे मुंबईतील ५१ पत्रकार कोरोना पॉझिटिव्ह ! - सूत्र
 

राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यांना लोकशाहीने जे अधिकार दिलेत त्यानुसार ते निर्णय घेतील.दबाव कशाला आणत आहात? लोकशाहीच्या नावाने गळा काढता ना,मग आता लोकशाहीने वागा.पत्रपंडितांनी अकलेचे तुणतुणं वाजवण्याची काय गरज? राजभवनाच्या नावाने बोंबा मारायला आता शिमगा आहे का? असा सवाल शेलार यांनी  केला आहे.

bjp leader ashish shelar replies to the tweet of mp sanjay raut


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp leader ashish shelar replies to the tweet of mp sanjay raut