भाजपच्या चित्रा वाघ यांचा यशोमती ठाकूर यांना टोला

पूजा विचारे
Friday, 16 October 2020

यशोमती ठाकूर यांच्यावर भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या नेत्या आणि महिला - बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना न्यायालयाने आठ वर्षं जुन्या प्रकरणात गुरुवारी दोषी ठरवलं.

मुंबईः  काँग्रेसच्या नेत्या आणि महिला - बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना न्यायालयाने आठ वर्षं जुन्या प्रकरणात गुरुवारी दोषी ठरवलं. ना तीन महिने तुरुंगवास आणि 15000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ठाकूर यांची जामिनावर सुटका झाली आहे. भाजपने यावर यशोमती ठाकूर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यशोमती ठाकूर यांच्यावर भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी निशाणा साधला आहे. 

गाडी का अडवली? म्हणून पोलिसांना मारहाण केलेल्या तत्कालीन आमदार आणि विद्यमान मंत्री @AdvYashomatiINC यांच्यावरील गुन्हा न्यायालयात सिद्ध झाला. खरं तर मागणी करायच्या आधीच नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यायला हवा होता पण 'खिसे गरम' करायचं गणित तुम्हाला थोडी स्वस्थ बसू देत असेल?, असं ट्विट करत चित्रा वाघ यांनी यशोमती ठाकूर यांना टोला हाणला आहे. 

नेमकं काय आहे प्रकरण

ही घटना 24 मार्च 2012 रोजी घडली होती. यशोमती ठाकूर यांनी अमरावतीच्या प्रसिद्ध अंबादेवी मंदिराजवळ पोलिसाची हुज्जत घातली होती. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता.  पोलिस कॉन्स्टेबल उल्हास रौराळे यांच्याशी हुज्जत आणि मारण्याचा प्रयत्न करणे, शासकीय कामात अडथळा आणणे या प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली. ठाकूर यांच्यावर  पोलिस कॉन्सेटबलवर हात उगारल्याचाही आरोप होता.

BJP leader Chitra Wagh slammed Yashomati Thakur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leader Chitra Wagh slammed Yashomati Thakur