
हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या जिल्हा बँकेची (Kolhapur District Central Bank) मध्यरात्री दोन वाजेपर्यंत ईडीकडून तपासणी करण्यात आल्याची माहिती आहे.
Kirit Somaiya : मुश्रीफजी, तुम्हाला हिशोब तर द्यावाच लागणार; ED कारवाईनंतर सोमय्यांचं पुन्हा चॅलेंज
मुंबई : कोल्हापुरातील राष्ट्रवादीचे वजनदार नेते आणि आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना धक्का देणारी बातमी काल (बुधवार) समोर आली. हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधीत बँकेवर ईडीनं (ED Raid) धाड टाकली.
या घटनेमुळं कोल्हापुरात (Kolhapur) एकच खळबळ उडाली होती. हसन मुश्रीफ चेअरमन असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर ईडीनं धाड टाकली. काल सकाळीच ईडीचे अधिकारी कोल्हापुरात दाखल झाले आणि त्यांनी जिल्हा बँकेतील कागदपत्राची तपासणी केली.
हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या जिल्हा बँकेची (Kolhapur District Central Bank) मध्यरात्री दोन वाजेपर्यंत ईडीकडून तपासणी करण्यात आल्याची माहिती आहे. संताजी घोरपडे कारखाना आणि ब्रिक्स इंडियाच्या कर्ज खात्यांची चौकशी यादरम्यान करण्यात आली. बँकेच्या मुख्य कार्यालयासह इतर शाखामध्येही तपासणी केली. ही सगळी घडामोड सुरू असतानाच पुन्हा एकदा भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) हसन मुश्रीफांना थेट आव्हान दिलंय.
आता कोल्हापूर जिल्हा बँकांमध्ये ईडीची चौकशी सुरू. अनेक बेनामी खाते, शेतकऱ्यांच्या नावाने बोगस FD तर चौकशी होणारच, हसन मुश्रीफजी तुम्हाला हिशोब तर द्यावाच लागणार, असं किरीट सोमय्यांनी म्हटलंय. सोमय्यांच्या प्रतिक्रियेवर मुश्रीफ काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.