किरीट सोमय्यांनी प्रताप सरनाईक यांच्यावर केला नवा आरोप

पूजा विचारे
Tuesday, 12 January 2021

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यावर आणखी एक आरोप केला आहे.

मुंबईः भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यावर आणखी एक आरोप केला आहे. ठाणे येथे प्रताप सरनाईक यांच्या विहंग गार्डन B1, B2 नामक 13 मजली आणि 13 वर्ष जुन्या अनधिकृत इमारती असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. 

या अनधिकृत इमारती अधिकृत करण्यासाठी आता ठाकरे सरकार पुढे सरसावला असल्याचा आरोपही सोमय्या यांच्याकडून करण्यात येत आहे. गेल्या महिन्यात प्रताप सरनाईकांचा हा घोटाळा आम्ही बाहेर काढला असल्याचंही सोमय्यांनी म्हटलं आहे. 

ठाणे महानगरपालिकेनी 29 डिसेंबर 2020 ला ठाकरे सरकारला विनंती केली आहे, की या इमारती अधिकृत करण्यासाठी आम्हाला मुभा द्या, असंही सोमय्या म्हणाले आहेत. 

सोनू सूद कंगना राणावत यांचे घर/कार्यालयाचे बांधकाम 24 तासात उध्वस्त करण्याचे आदेश उद्धव ठाकरे देतात. मात्र 13 वर्ष फसवणूक करणार्‍या प्रताप सरनाईकला अभय, अशी टीकाही सोमय्यांनी ठाकरे सरकारवर केली आहे. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

एकीकडे प्रताप सरनाईक यांच्यावर अजूनही ईडीच्या चौकशीची टांगती तलवार आहे. याआधीही किरीट सोमय्या यांनी ठाण्यात  अनधिकृतपणे इमारत बांधल्याचा आरोप केला होता.  सरनाईक यांच्या विहंग गार्डन या इमारतीला पालिकेचा परवाना नाही. ही इमारत अनधिकृत आहे. त्यामुळे महापालिका आणि पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले होते. त्यावेळी सोमय्यांनी पत्रकार परिषद घेऊन हे आरोप केले होते. 

हेही वाचा- TRP Case: विशेष तपास पथकाकडून 3600 पानांचे पुरवणी आरोपपत्र दाखल

 bjp leader Kirit Somaiya makes new allegations against shivsena mla Pratap Saranaik


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp leader Kirit Somaiya makes new allegations against shivsena mla Pratap Saranaik