राजभवनाच्या अंगणात मोठ्या भेटीगाठी, राणे म्हणतायत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 मे 2020

महाराष्ट्रातील ठाकरे सरकार हे कोरोनाची संवेदनशील परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरली आहे. - नारायण राणे 

मुंबई - कोरोनाच्या संवेदनशील परिस्थितीत महाराष्ट्रातील राजकारण तापलंय. अशात आज राजभवनावर भेटीगाठींचा सिलसिला पाहायला मिळाला. आज \सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. ही भेट अर्धा तास सुरु होती. त्यानंतर भाजप नेते नारायण राणे यांनी राज्यपालांची भेट घेतली. ही ५० मिनिटं होती. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि महाविकास आघाडीवर आगपाखड केलीये.  

महाराष्ट्रातील ठाकरे सरकार हे कोरोनाची संवेदनशील परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरली आहे, या सरकारची कोरोना परिस्थिती हाताळण्याची क्षमता नसल्याचं राणे म्हणालेत. महत्त्वाची बाब म्हणजे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी असंही राणे म्हणालेत. 

हृदयद्रावक ! "...यांनी उशीर केला, माझे पप्पा गेले हो"; बेडसाठीची १२ तासांची फरफट व्यर्थ

महाविकास आघाडीचं सरकार लोकांचा जीव वाचवण्यास सक्षम नाही असा घणाघात  नारायण राणे यांनी केलाय. या सरकारचा कसलाही अभ्यास नाही, सरकारी अधिकाऱ्यांना कसं सांभाळायचं पोलिसांची कशी काळजी घायची, यामध्ये सरकार अपयशी ठरलंय अशीही टीका नारायण राणे यांनी केलीये.  

महाराष्ट्रात रुग्णसंख्या ५० हजारांच्यावर आहे. राज्यात हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा कोरोनामुळे जीव गेलाय. अशात नारायण राणे यांनी राज्यपालांकडे महापालिका आणि राज्य सरकारच्या ताब्यातील रुग्णालयं लष्कराच्या ताब्यात देण्यात यावेत अशीही मागणी नारायण राणे यांनी केलीये. लष्कराच्या ताब्यात केवळ रुग्णालये नव्हे तर राज्य का देऊ नये? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

BIG NEWS - तासाभरात करता येणार कोरोनाचे निदान, सर्वसामान्यांना परवडणाऱ्या 'टेस्ट'ची निर्मिती

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीच्या सरकारची  कोरोनाशी सामना करण्याची क्षमता नाही, त्यामुळे या सरकारला नारळ द्यावा आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी नारायण राणे यांनी केलीये. 

BJP leader narayan rane demands for presidential rule in maharashtra


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leader narayan rane demands for presidential rule in maharashtra