भेंडीबाजारातील महिला शेतकरी कशा? प्रवीण दरेकर यांची टीका

भेंडीबाजारातील महिला शेतकरी कशा? प्रवीण दरेकर यांची टीका

मुंबई: कृषी कायद्याविरोधात मुंबईत काढलेल्या शेतकरी मोर्चात मारुन मुटकून आणलेले लोकं जास्त होते, त्यात शेतकरी कमी आणि घुसवलेले लोकं जास्त होते, 'भेंडी बाजारातील महिला शेतकरी कधी पासून झाल्या ? अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

काल ज्या महिला आझाद मैदानावर उपस्थित होत्या. त्या महिला भेंडी बाजारातील होत्या. मग त्या महिला मोर्चात सहभागी कशा झाल्या होत्या, असा प्रश्नही दरेकर यांनी उपस्थित केला आहे.

राज्यपालांनी शेतकऱ्यांना वेळ दिली नाही, हे आरोपही दरेकर यांनी खोडून काढले. शेतकऱ्यांची काही राजकीय पक्षांकडून दिशाभूल होत आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे संवेदनशील असून ते सगळ्यांना भेटतात, त्यामुळे त्यांच्यावर विनाकारण टीका करू नये. कोरोना संकट काळात राज्यपालांचे काम संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे, असे ते म्हणाले.

राज्यपालांकडे गोव्याचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला असून गोव्यातील अधिवेशनाच्या कार्यक्रमाचे नियोजन चार महिन्यापूर्वीच करण्यात आले होते. विधिमंडळाचे कार्यक्रम चार महिन्यांआधी ठरतात हे सरकारमध्ये असलेल्या नेत्यांना माहिती नाही का? अर्थात झोपलेल्या लोकांना उठवता येतं, मात्र झोपेचे सोंग केलेल्यांना उठवता येत नाही, अशा शब्दांत दरेकर यांनी राज्यातील सत्ताधारी नेत्यांची खिल्ली उडवली. 

शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न होत आहे. शेतकऱ्यांच्या विषयी या मंडळींचं ढोंग सुरू आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भूमिकाही सातत्याने बदलत असते हे सगळ्यांनी पाहिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते मोर्चाला न गेल्याने त्यांचीही भूमिका बदललेली दिसत आहे. शिवसेनेनं त्यांची भूमिका स्पष्ट करावी, अशी टीकाही दरेकर यांनी केली.

-----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

bjp leader pravin darekar criticism Farmers protest azad maidan

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com