भाजपचे जेष्ठ नेते सरदार तारासिंह यांचं लिलावातीमध्ये दीर्घ आजाराने निधन

सुमित बागुल
Saturday, 19 September 2020

आज दुपारपर्यंत त्यांच्या अंत्यविधी कधी आणि कुठे होणार याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचं समजतंय.  सरदार तारासिंग आपल्या कामाच्या धडाडीमुळे खूप प्रसिद्ध होते.

मुंबई : भाजपचे माजी आमदार सरदार तारासिंह यांचं निधन झालंय. भाजा नेते किरीट सोमय्या यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिलीये. तारासिंह यांचं हृदयविकाराने निधन झालंय. मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. सरदार तारासिंह हे गेला महिना दीड महिना रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र आज सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

आज दुपारपर्यंत त्यांच्या अंत्यविधी कधी आणि कुठे होणार याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचं समजतंय.  सरदार तारासिंग आपल्या कामाच्या धडाडीमुळे खूप प्रसिद्ध होते. मुंबईतील मुलुंड भागात ते आमदार होते. अनेक वर्ष त्यांना आमदार म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली होती. अगदी सुरवातीपासून म्हणजेच जनसंघापासून ते भारतीय जनता पक्षाशी ते जोडले गेले होते. सरदार तारासिंह हे जेष्ठ नेते होते. किरीट सोमय्या यांनी त्यांच्या निधनाची बातमी ट्विटरवरून दिली आहे. 

महत्त्वाची बातमी राज्यपालांवर कंगनाला भेटण्याचा दबाव होता का ? सचिन सावंत यांचा सवाल

महत्त्वाची बातमी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मुंबईकरांचा अंडी, चिकनवर ताव; मागणी वाढल्याने भाव कडाडले
 

माझे वरिष्ठ सहकारी, भारतीय जनता पक्षाचे नेते सरदार तारासिंह यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झालंय. मुंबईतील लिलावातीमध्ये त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, सरदार तारासिंह यांच्यासाठी प्रार्थना. असं किरीट सोमय्या यांनी ट्विट केलंय.  आज दुपारनंतर त्यांचा अंत्यविधी कधी आणि कुठे होणार याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. 

BJP leader Sardar Tarasing after prolonged illnesses died at Lilavati Hospital


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leader Sardar Tarasing after prolonged illnesses died at Lilavati Hospital