भाजपच्या मंडल अध्यक्षाची महिला पदाधिकाऱ्याला शिवीगाळ

संजय शिंदे
रविवार, 7 ऑक्टोबर 2018

मुंबई : धारावी विधानसभेची सन 2014 ची निवडणूक लढलेल्या भाजपा मुंबई सचिव दिव्या ढोले यांना त्यांच्याच पक्षाचे पदाधिकारी असगर शेख यांच्या मोबाईलवर घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून भारतीय जनता पक्षाचे धारावी मंडल अध्यक्ष मनी बालन यांच्यावर धारावी पोलिस ठाणे येथे काल ता. 6 रोजी रात्री गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामुळे धारावीत खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे.

मुंबई : धारावी विधानसभेची सन 2014 ची निवडणूक लढलेल्या भाजपा मुंबई सचिव दिव्या ढोले यांना त्यांच्याच पक्षाचे पदाधिकारी असगर शेख यांच्या मोबाईलवर घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून भारतीय जनता पक्षाचे धारावी मंडल अध्यक्ष मनी बालन यांच्यावर धारावी पोलिस ठाणे येथे काल ता. 6 रोजी रात्री गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामुळे धारावीत खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे.

गेली 15 वर्षापेक्षा जास्त काळ दिव्या ढोले पक्षाचे काम करत असून, मुंबई भाजपा सचिव पादीची जबाबदारी पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. धारवी भागात संकल्प सिद्धी ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रश्न मार्गी लावून सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचवत जनमानसात ढोले यांचा प्रभाव वाढत चालला आहे. यामुळे आपल्याला पुढे विधानसभेची तिकीट मिळणार नसल्याचे लक्षात आल्यानेच बालन हे एवढ्या खालच्या पातळीवर उतरले. घाणेरडे वक्तव्य, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून महिलेची बदनामी, मानहानी व महिलेस लज्जा येईल असे वक्तव्य केल्याबद्दल कलम 500 व 509 अंतर्गत बालन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे.

गुन्हा नोंद करायच्या अगोदर वरिष्ठ नेत्यांना पत्रव्यवहार करून व प्रत्यक्ष भेट घेऊन झालेल्या प्रकाराची सविस्तर माहिती नेत्यांना देऊनही वरिष्ठांनी त्याची दखल न घेतल्याने शेवटी हा टोकाचा निर्णय 'संकल्प सिद्धी ट्रस्ट'च्या विश्वस्त व भाजपा मुंबई सचिव दिव्या ढोले यांनी घेतला. पक्षात जर एखाद्या महिलेचा आदर होत नसेल महिलांना चुकीची वागणूक दिली जात असेल महिलांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला पक्ष पाठीशी घालत असेल तर सर्वसामान्य महिलांना कसे संरक्षण देणार असा सवाल ढोले यांनी केला आहे.

धारावीत गेले पाच वर्षे महिला पदाधिकारी नेमणूक करण्यात आलेली नाही. आणि आमच्या सारख्या महिला पक्ष वाढवण्याचे काम करूनही जर न्याय मिळत नसेल तर काय? म्हणून माझ्यासोबत असलेल्या महिलांच्या आग्रहाखातर व माझ्यावर विनाकारण झालेल्या अन्याय व बदनामी विरुद्ध मी रीतसर धारावी पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद केला असल्याचे ढोले यांनी दैनिक 'सकाळ' शी बोलताना सांगितले.

या गुन्ह्यामुळे भाजपा पक्ष आता काय निर्णय घेणार व अशा पदाधिकाऱ्यावर कोणती कारवाई करणार असा प्रश्न धारावीतील भाजपा पक्षातील महिला पदाधिकारी व धारावीतील समस्त नागरिक विचारत आहेत.

Web Title: BJP leader used bad words to women parity worker