राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया

पूजा विचारे
Sunday, 27 September 2020

शनिवारी भारतीय जनता पक्षानं नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली. . भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केंद्रीय पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा केली. यामध्ये महाराष्ट्रातील ४ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.

मुंबईः  शनिवारी भारतीय जनता पक्षानं नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली. . भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केंद्रीय पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा केली. यामध्ये महाराष्ट्रातील ४ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रातून पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांना राष्ट्रीय सचिवपदी नेमणूक करण्यात आली आहे. या नेमणूकीमुळे दोघांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न पक्षाकडून करण्यात आल्याचं दिसत आहे. आता या नेमणूकीवर विनोद तावडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत सचिव म्हणून स्थान मिळाल्यानंतर विनोद तावडे यांनी आनंद व्यक्त केला आहे. पक्ष जे जे काम देईल, ते काम करणारा कार्यकर्ता असल्याची प्रतिक्रिया तावडे यांनी व्यक्त केली आहे. 

विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुनील देवधर, विजया रहाटकर यांना सचिवपदाची तर, हीना गावित यांना प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपचे  ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा डावलण्यात आलं आहे. 

विनोद तावडे यांनी मिळालेल्या या नव्या जबाबदारीचे मनापासून स्वागत केलं आहे.  पक्षाने आज मला राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची जी संधी दिली आहे, ती पूर्ण ताकदीने, माझ्या अनुभवाने आणि कौशल्याने पार पाडेल. मला संधी दिल्याबद्दल आमचे नेते नरेंद्र मोदी, अमित शहा, जे.पी.नड्डा, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील यांचा मनापासून आभारी असल्याचं विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत विनोद तावडे यांनी पक्षानं तिकीट नाकारलं होतं. त्यानंतर पक्षात आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती. मात्र तावडेंनी पक्षाचा निर्णय मान्य करत चांगला कार्यकर्ता म्हणून आपले काम सुरुच ठेवलं होतं.

BJP Leader Vinod Tawde Reaction After Appointed General Secretary New Bjp Team


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Leader Vinod Tawde Reaction After Appointed General Secretary New Bjp Team