भाजपच्या विकासनामा प्रसिद्ध

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

ठाणे - भाजपने रविवारी जाहीर केलेल्या विकासनाम्यात महिलांसह ज्येष्ठांसाठी विविध उपक्रम राबवण्याचे आश्‍वासन देण्यात आले आहे. 

ठाणे - भाजपने रविवारी जाहीर केलेल्या विकासनाम्यात महिलांसह ज्येष्ठांसाठी विविध उपक्रम राबवण्याचे आश्‍वासन देण्यात आले आहे. 

भाजपने विकासनाम्यात महिलांसाठी ई-टॉयलेट, महिला बचत गटांना प्रोत्साहन, महिला व मुलांची सुरक्षितता, आरोग्य, स्वावलंबनासाठी विशेष प्रयत्न, खासगी संस्थांना पाळणाघरासाठी प्रोत्साहन, रोजगारनिर्मिती, स्वयंरोजगार केंद्र, पदपथ, मैदाने, ओपन जिम, वीजपुरवठा, पाणीपुरवठा, ड्रेनेज यांची उत्तम व्यवस्था करण्यासाठी विशेष योजना, पार्किंग धोरण, फेरीवाला धोरण, फेरीवालामुक्त पदपथ, तीन हात नाका, कॅडबरी जंक्‍शन येथे सबवेची निर्मिती, रिंग रूट बस सेवा, स्थानक परिसर फेरीवालामुक्त करण्याचे आश्‍वासन दिले आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा केंद्र, कट्ट्यासाठी विविध उपक्रम, विमा योजना, डे केअर सेंटर, ठाणे-पूर्व, खारेगाव, कळवा व नागला बंदर खाडीकिनारी चौपाटी विकसित करणार, ठाणे रेल्वेस्थानकाचा विकास, नाटकांच्या तालमीसाठी हॉल उपलब्ध करून देणार, युद्धामध्ये हुतात्मा झालेल्या ठाण्यातील सैनिकांच्या कुटुंबीयांना करामध्ये विशेष सवलत, आरक्षित सुविधा भूखंड केवळ नागरी सुविधांसाठी वापरणार, केंद्र व राज्याच्या विविध योजनांसाठी नागरी सुविधा केंद्र उभारणार, बीएसयूपीमध्ये दर्जेदार बांधकाम व पारदर्शकता, ठाण्यात फुटबॉल व हॉकी स्टेडियमची निर्मिती, खो-खो, कबड्डी व कुस्तीसाठी विशेष क्रीडा संकुलाची निर्मिती करणार, जिम्नॅस्टिकसाठी दर्जेदार संकुल उभारणार, ई-गव्हर्नन्सचा अधिकाधिक वापर, पालिकेच्या कारभाराची माहिती इंटरनेटच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवणार, सर्व स्मशानभूमी अद्ययावत करणार, जलवाहतूक योजना यशस्वी करणार, कोलशेत व बाळकूम येथे जेट्टी उभारून फेरीबोट व पर्यटकांसाठी विशेष पिकनिक स्पॉट विकसित करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

Web Title: bjp manifesto thane