भाजप नगरसेवकाचा सभेत गोंधळ 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जुलै 2018

नवी मुंबई - महापालिकेतील भाजपचे नगरसेवक दीपक पवार यांनी मंगळवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेच्या कामकाजादरम्यान प्रचंड गोंधळ घालत तोडफोड केली. सभेच्या पटलावर आलेला बहुमजली वाहनतळ उभारणीचा प्रस्ताव अभ्यास करण्याच्या कारणामुळे सत्ताधाऱ्यांनी चर्चेस घेण्यास नकार दिला. त्यामुळे पवार यांना राग अनावर होत त्यांनी प्रस्तावाच्या प्रती फाडून, समोरील माईकची तोडफोड करीत महापौरांच्या आसनाकडे धाव घेतली. 

बेलापूर सेक्‍टर 15 येथे भूखंड क्रमांक 39 वर बहुमजली वाहनतळ उभारण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने पार पडलेल्या सभागृहात सादर केला होता. या प्रस्तावासोबत सार्वजनिक व सामुदायिक स्वच्छतागृहांचे देखभालीचा प्रस्तावही सादर झाला होता; मात्र या दोन्ही प्रस्तावांवर सखोल अभ्यास करण्याची गरज असून, त्यासाठी हे दोन्ही प्रस्ताव स्थगित ठेवावेत, अशी सभागृह नेते रवींद्र इथापे यांनी मागणी केली. त्यावर संतापलेल्या दीपक पवार यांनी आपल्या जागेवर उभे राहत जोरदार गोंधळ घालण्यास सुरुवात केली. हा प्रस्ताव स्थगित करू नका, अशी विनंती त्यांनी सभागृहाला केली; मात्र तोपर्यंत महापौर जयवंत सुतार यांनी इथापे यांची मागणी मान्य करीत प्रस्तावांना स्थगिती दिली. यावर संतापलेल्या पवार यांनी आपल्या जागेवरील माईकची तोडफोड करत जागेवर प्रस्तावाच्या प्रती फाडून महापौरांच्या समोरच्या वेलमध्ये भिरकाऊन दिल्या. तसेच पिण्यासाठी दिलेल्या दोन स्टीलच्या बाटल्यांची मोडतोड केली. यावरही त्यांचे समाधान न झाल्याने अखेर त्यांनी महापौर व उपमहापौर बसतात त्या आसनावर धाव घेतली; मात्र शिवसेनेचे पक्षप्रतोद द्वारकानाथ भोईर व विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी त्यांची समजूत घातल्यानंतर ते खाली उतरले. 

Web Title: BJP meeting elected confusion