भाजपकडून माझ्या पतीच्या नावाचा गैरवापर - जयश्री वनगा

वृत्तसंस्था
रविवार, 20 मे 2018

भारतीय पक्षाचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या पत्नी जयश्री वनगा यांनी भाजपविरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे. चिंतामण वनगा नावाचा भाजपकडून गैरवापर केला जात असून, भाजपविरोधात कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
 

पालघर - भारतीय पक्षाचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या पत्नी जयश्री वनगा यांनी भाजपविरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे. चिंतामण वनगा नावाचा भाजपकडून गैरवापर केला जात असून, भाजपविरोधात कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

भाजपचे उमेदवार राजेंद्र गवित यांच्या निवडणुक प्रचारसाहित्यावर आमची कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता दिवंगत चिंतामण वानगा यांचे छायाचित्र छापले असल्याचे त्यांनी आपल्या तक्रार अर्जामध्ये म्हटले आहे. केवळ मतांची भीक मागण्यासाठी हा प्रकार केला जात आहे. त्याचबरोबर माझ्या पतीच्या नावाचा वापर करुन मते मागितली जात आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

भाजपला माझ्या पतीच्या नावाचा किंवा छायाचित्राचा वापर करु देऊ नये असे त्यांनी निवडणूक अधिकऱ्यांना दिलेल्या तक्रार अर्जात स्पष्ट म्हटले आहे. हा प्रकार थांबला नाही तर त्या न्यायालयात दाद मागतील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: BJP misuses my husband's name says Jayshree Wanga