पावसावर खापर फोडू नका?, आशिष शेलारांकडून शिवसेनेवर प्रश्नांचा भडिमार

पूजा विचारे
Thursday, 24 September 2020

या पावसात दक्षिण मुंबईतील अनेक भाग पाण्याखाली गेले. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर प्रश्नांचा भडिमार केला आहे. तसंच तत्कालीन आयुक्तांनी केलेल्या नालेसफाईच्या दाव्यावरुनही टोला लगावला आहे. 

मुंबईः पावसाने बुधवारी पुन्हा मुंबईची झोप उडवली. निम्मी मुंबई मंगळवार मध्यरात्री पासून पाण्याखाली गेली होती. पहाटे पासून संपूर्ण मुंबई ठप्प पडली होती. अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसाय बुधवारी बंद ठेवण्यात आले होते. पहाटे पासून संध्याकाळपर्यंत लोकल वाहतूक बंद होती. अनेक भागांमध्ये पावसाचं पाणी घरांमध्ये घुसलं होतं. या पावसात दक्षिण मुंबईतील अनेक भाग पाण्याखाली गेले. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर प्रश्नांचा भडिमार केला आहे. तसंच तत्कालीन आयुक्तांनी केलेल्या नालेसफाईच्या दाव्यावरुनही टोला लगावला आहे. 

पाऊस जास्त पडला सांगत पावसावर खापर फोडू नका? नुसते फिरुन उपयोग काय? ब्रिटानियाचे पंपिंग स्टेशन पुर्ण क्षमतेने का चालत नाही ते सांगा? मायक्रो टनेलची कामे वेळेत पुर्ण का झाली नाही ते ही सांगा? पाण्याचा निचरा होण्यास एव्हढा विलंब कधी होत नव्हता, मग आता का विलंब होतोय हेही सांगा?,” असं शेलार यांना म्हटलं आहे.

हिंदमाता, वरळीसह अनेक भागातील पाण्याचा निचरा का होत नाही? मुंबईकरांच्या घरातील पाणी का अजून कमी होत नाही? ११६ टक्के नालेसफाईचे दावे कुठे गेले? रात्री अजून पाऊस झाला तर मुंबईकरांनी करायचे काय? कलानगरचे पाणी तातडीने ओसरते मग, मुंबईतील अन्य ठिकाणांचे का नाही?, असं विचारत शेलार यांनी प्रश्नांचा भडिमारच शिवसेनेवर केला आहे. 

शिव मालाड सबवे अंधेरी सबवे या भागात पाणी साचल्याने संपुर्ण वाहतूक ठप्प पडली होती. मुंबईतील  अनेक ठिकाणच्या रेल्वे मार्गात पाणी साचल्याने पहाटे पासून संध्याकाळ पर्यंत रेल्वे वाहतूक बंद होती. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यासह पालिकेच्या वरीष्ट अधिकार्यांनी विविध ठिकाणी भेटी देऊन परीस्थीतीचा आढावा घातला.वेधशाळेने अतिवृष्टीचा इशारा दिलेला इसल्याने मुंबईतील अत्यावश्यक सेवा वगळता इतर कार्यालये बंद ठेवण्यात आली होती. मात्र,अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्यांना प्रचंड मनस्ताप भोगावा लागला. 

Bjp mla ashish shelar attack bmc Shivsena uddhav thackeray


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bjp mla ashish shelar attack bmc Shivsena uddhav thackeray