"राष्ट्रवादीची सत्ता आहे.. मग तर एकच शिव जयंती झालीच पाहिजे!"

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 4 February 2020

मुंबई - महाराष्ट्रात आता नवीन वाद पेटण्याची शक्यता आहे. हा वाद आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा. शिवसेनेने कायमच तिथीनुसारच शिवजयंती साजरी केली जावी असा आग्रह धरलाय. या आधी शिवसेना भाजपसोबत सत्तेत होती, त्यावेळी देखील शिवसेनेने तिथीनुसार शिवजयंती साजरी करावी असा आग्रह धरला होता. मात्र आता महाराष्ट्रातील राजकीय चित्र पालटलंय. शिवसेना आता काँग्रेस आणि राष्ट्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तेत आहे. अशात राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरी यांनी उद्धव ठाकरेंना तिथीचा हट्ट सोडून १९ तारखेला शिवजयंती जाहीर करा असं आवाहन केलंय.     

मोठी बातमी - शिवजयंतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला केलं 'हे' आवाहन...

आता राष्ट्रवादीच्या नेत्याकडून शिवसेनेला हे आवाहन करण्यात आल्याने विरोधक कसे शांत बसतील. अशात आयात भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील शिवसेनेला शिवजयंतीवरून टोला लगावलाय.. पाहा काय म्हणालेत नितेश राणे.. 

मोठी बातमी - 'आई अंकल येईल..'; आणि आईच्या पायाखालची जमीनच सरकली..

राष्ट्रवादी ची सत्ता आहे.. मग तर एकच शिव जयंती झालीच पाहिजे! एकदा काय तो दोन शिव जयंती चा वाद मोडून टाकाच !!  एक शिव प्रेमी म्हणून तुमच्या बरोबर आहे !
हीच ती वेळ ! जय शिवराय!!! असं  ट्विट नितेश राणे यांनी केलंय. यापूर्वी देखील नितेश राणे यांनी तिथीनुसार शिवजयंती बंद करावी अशी मागणी केली होत. आता शिवसेना ज्यांच्यासोबत सत्तेत आहे, त्यांनीच ही मागणी केल्याने नितेश राणे यांनी हा मुद्दा लावून धरलाय. 

मोठी बातमी - 'या' पोराने 'गुगल'ला येडा बनवून खाऊ घातला पेढा..

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मावेळी इंग्रज भारतात नव्हते. त्यावेळी इंग्रजी कॅलेंडरनुसार कालगणना देखील होत नसे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही तिथीनुसार साजरी व्हायला हवी अशी शिवसेनेची भूमिका आहे. मागच्या काळात शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील पत्र लिहून तिथीनुसार शिवजयंती साजरी करावी अशी विनंती केलेली.     

मोठी बातमी - ...आणि समोरून धडधडत आला मृत्यू, बातमी वाचाल तर डोळ्यातून पाणी येईल

शिवजयंतीचा वाद तास काही नवीन नाही. आता महाराष्ट्रातील सत्ता पालटल्याने येत्या काळात हा वाद आणखी उफाळून येईल असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. 

bjp mla nitesh rane pokes shivsena over shivjayanti says there should be only on shivjayanti

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp mla nitesh rane pokes shivsena over shivjayanti says there should be only on shivjayanti