भाजप आमदार प्रसाद लाड कोरोना पॉझिटिव्ह, ट्विट करुन दिली माहिती

पूजा विचारे
Friday, 20 November 2020

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनी स्वतः ट्विट करुन दिली आहे. प्रसाद लाड यांना रुग्णालयात आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. 

मुंबईः  भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनी स्वतः ट्विट करुन दिली आहे. प्रसाद लाड यांना रुग्णालयात आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. 

प्रसाद लाड यांनी ट्विटमध्ये लिहिलं की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून, सध्या मी आयसोलेशनमध्ये आहे.डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे हॉस्पिटलमध्ये औषधोपचार घेत आहे.मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना माझी विनंती आहे,स्वत:ची काळजी घ्यावी, आवश्यक वाटत असेल, तर स्वतःची चाचणी करून घ्यावी.

तसंच डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषधोपचार सुरु असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे कोरोनाचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेत. खडसे यांना कोरोनाची लागण झाल्याचं बोललं जात होतं. कोरोनाची लागण झाल्यामुळे एकनाथ खडसे मुंबईमध्ये दाखल झाले आणि उपचारासाठी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. रुग्णालयात त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. आता या चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार,  एकनाथ खडसे मुंबईत आल्यानंतर रुग्णालयात करण्यात आलेल्या चाचणीचे दोन्ही ही रिपोर्ट निगेटिव्ह आलेत. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान मला कोरोनाची लागण झाली असून माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि कोरोनाची चाचणी करावी. तसेच मी बरा होईपर्यंत भेटण्यास येऊ नये, असं आवाहन एकनाथ खडसे यांनी केलं होतं.

BJP MLA Prasad Lad Corona Positive Appeal take care


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP MLA Prasad Lad Corona Positive Appeal take care