Vidhan Sabha 2019 : आदित्य ठाकरेंपाठोपाठ राम कदमांचे गुजराती बोल!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

'महाराष्ट्रात मराठीच' असे बजावणारे कदम 2014 मध्ये मनसे सोडून भाजपमध्ये गेले आणि पुन्हा निवडून आले.

मुंबई : भाजपचे आमदार राम कदम यांनी विधानसभा निवडणुकीत मतांसाठी गुजराती फलक झळकवले आहेत. या फलकांवरून परिसरात चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे 2009 मध्ये मनसेचे आमदार म्हणून निवडून आलेल्या कदम यांनी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना हिंदीत शपथ घेतली म्हणून मारहाण केली होती. 

- Vidhan Sabha 2019 : पवार विरुद्ध ईडी लढाई अजून बाकी : उद्धव ठाकरे

'महाराष्ट्रात मराठीच' असे बजावणारे कदम 2014 मध्ये मनसे सोडून भाजपमध्ये गेले आणि पुन्हा निवडून आले. या निवडणुकीतही घाटकोपर पश्‍चिम मतदारसंघातून उभे असलेले कदम यांनी गुजराती भाषेतील बॅनर लावले आहेत. हे फलक समाज माध्यमांवरून व्हायरल झाले असून, परिसरात त्यावरून चर्चा सुरू झाली आहे.

- 500 BMC कर्मचाऱ्यांची दिवाळी काळी होण्याच्या मार्गावर

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी वरळी परिसरात गुजराती व अन्य भाषांत फलक लावले होते. नेटकरांनी 'ट्रोल' केल्यानंतर ते फलक हटवण्यात आले. घाटकोपर पश्‍चिम मतदारसंघातील मराठी मतदारांचे प्रमाण 51 टक्‍क्‍यांहून अधिक असून, गुजराती भाषक मतदारांचे प्रमाण 10 ते 12 टक्के आहे.

- Satellite Shankar: सॅटेलाइट शंकरचा पोस्टर रिलिज, सूरज पांचोलीचा दमदार लूक

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही शुक्रवारी जाहीर सभेत बोलताना 'आमच्याकडे होता, तेव्हा राम होता; आता रावण झाला' अशी टीका राम कदम यांच्यावर केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP MLA Ram Kadam showed Gujarati banner for votes for Maharashtra Vidhan Sabha 2019