esakal | भाजपा आमदार रविंद्र चव्हाण आलेत चर्चेत
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

भाजपा आमदार रविंद्र चव्हाण होतायत ट्रोल !

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली - डोंबिवलीतील (Dombivali) सावित्रीबाई फुले कलादालनात मंगळवारी विकासकामांचा लोकार्पण सोहळा राजकीय टिकाटिप्पणीनेच गाजला. बुधवारीही या कार्यक्रमाचे पडसाद समाज माध्यमावर उमटत होते. 'आमदार (MLA) चव्हाण (Chavan) यांचे 'कनेक्शन टाईट करा' हे भाजपाचेच (BJP) केंद्रीय मंत्री कपिल पाटील (Kapil Patil) यांचे वक्तव्य असलेला व्हिडीओ सेना (Shivsena) कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral) करीत असून त्यावर अनेक मिम्सही (memes) तयार होत आहेत. आमदार चव्हाण यांना सत्ताधारी टार्गेट करीत आहेत हे लक्षात येताच भाजपा (BJP) कार्यकर्त्यांनी चव्हाण(Chavan) यांची त्याच मंचावरील भाषणाची फेसबुक (Facebook) पोस्ट शेअर करत भावनिक साद घातली आहे.

हेही वाचा: कोरोनाची वाढती रुग्णसंख्या, कल्याण डोंबिवली पालिकेचा मोठा निर्णय

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यात राजकीय नाट्यपूर्ण घडामोडी मंगळवारी घडल्या. भाजपा आमदार रविंद्र चव्हाण यांनी विविध मुद्द्यांवर सेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. यावर मुख्यमंत्र्यांसह, पालकमंत्री, खासदार यांनी त्यांच्या कानपिचक्या घेतल्या.

मंत्री कपिल पाटील यांच्या भाषणाच्या सुरवातीला त्यांचा आवाज येत नव्हता. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, त्यांना आवाज जात नसला तरी मला आवाज येत होता, म्हणजे आपल्यातील कनेक्शन स्ट्रॉंग आहे. कनेक्शन लूज झाले की आमदार चव्हाण यांच्यासारखी परिस्थिती होते. त्यावर भाजपा केंद्रीय मंत्री पाटील म्हणाले चव्हाण यांचेही कनेक्शन टाईट करा असे बोलल्याने दालनात हशा पिकला.

याच मुद्द्याला हात घालत आता सेनेच्या कार्यकर्त्यांनी कापली पाटील यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर खाली आमदार चव्हाण यांचे कनेक्शन टाईट करा असे लिहीत संदेश व्हायरल केले जात आहेत. यावर अनेक मिम्सही तयार झाले आहेत.

हेही वाचा: चिपी विमानतळावरून आमदार केसरकरांचा राणेंना नाव न घेता टोला

यावर भाजपा कार्यकर्त्यांनी आमदार चव्हाण यांची बाजू उचलून धरत चव्हाण यांनी याच मंचावर एक कार्यकर्ता म्हणून मांडलेली व्यथा व्हायरल करण्यास सुरुवात केली आहे. चव्हाण यांनी फेसबुक पेजवर त्या भाषणाचा काही मजकूर पोस्ट केला आहे. हाच मजकूर शेअर करण्यास कार्यकर्त्यांनी सुरवात केली आहे. तसेच खाली भावनिक कमेंटसही करण्यात आल्या आहेत.

कार्यक्रम विकास कामांचा असला तरी भाजपा आमदार यांनी जगविलेल्या युतीच्या आठवणी आणि आताची भाजपा कार्यकर्त्यांची व्यथा यामुळे पुढे रंगलेले राजकीय नाट्यपूर्ण गोष्टींनी भाजपा आमदार चव्हाण हे चांगलेच चर्चेत आले आहेत.

loading image
go to top