esakal | "भाजपचं हे #OperationLotus नसून, #coronavirus आहे"
sakal

बोलून बातमी शोधा

"भाजपचं हे #OperationLotus नसून, #coronavirus आहे"

"भाजपचं हे #OperationLotus नसून, #coronavirus आहे"

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - मध्य प्रदेशात कमलनाथ यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकार पाडण्यासाठी 'ऑपरेशन लोटस' राबवलं जात असल्याचा आरोप  करण्यात येतोय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी हा घणाघाती आरोप केलाय. यामध्ये भाजपकडून आमदारांना हॉटेलमध्ये बंदिस्त करून त्यांना २५ कोटी रुपये ऑफर केले जातायत, असा आरोप देखील दिग्विजयसिंह यांनी केलाय.

काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या एकूण आठ आमदारांना गुरुग्राममधील एका बड्या हॉटेलमध्ये डांबून ठेवले आहे. मध्य प्रदेशात काल रात्री उशिरा या घडामोडी घडल्याचा दावा केला जातोय. अशात आता मोठ्या प्रमाणात राजकीय प्रतिक्रिया देखील येतायत. भाजपच्या विरोधकांवरून 'ऑपरेशन लोटस'वर कडाडून टीका करण्यात येतेय.   

मोठी बातमी - कोरोनामुळे तब्ब्ल 40 दिवसांनी घरी आलं पार्थिव आणि घरच्यांचा बांध फुटला...

भाजपच्या या 'ऑपरेशन लोटस'वर काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी वेगळ्याच शब्दात टीका केलीये. "भाजपचं वागणं हे कोरोनापेक्षा भयंकर आहे. सध्या काँग्रेसकडून यावर अँटीबायोटिक शोधण्याचा  प्रयत्न सुरु आहे" असं चव्हाण म्हणालेत.

VIDEO : आजींच्या अंगावरून धडधडत गेली मालगाडी, आजी मात्र दोन पायांवर उभ्या...

या बाबतीत बोलताना, "Operation Lotus आता भाजपचा नित्याचाच भाग झालेला आहे. आम्हाला याची आता सवय झालीये. मात्र, जे-जे पक्ष लोकशाहीला मानणारे आहेत, ते कधीही ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी होऊ देणार नाहीत. देशात लोकशाही मार्गानेच सरकार चालायला हवीत, मग हे सरकार कुणाचंही असो, असं देखील म्हणालेत. कमलनाथ हे सक्षम मंत्री आहेत आणि मध्यप्रदेशात काँग्रेसला कोणताही धोका नाही", असं देखील अशोक चव्हाण म्हणालेत. 

bjp is more scary than corona virus says congress leader ashok chavan on operation lotus