मुंबई भाजप अध्यक्षपदासाठी कोटक यांचे पारडे जड

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 22 मे 2019

मुंबई भाजप अध्यक्षपदी सलग दोन वेळा आमदार असलेले आशिष शेलार यांच्या जागी कुणीची वर्णी लागणार, याबाबत सध्या खलबते सुरू आहेत. यामध्ये योगेश सागर, अतुल भातखळकर, पराग आळवणी यांच्यासह लोकसभा निवडणूक लढवणारे मनोज कोटक यांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये कोटक यांचे पारडे जड असल्याचे मानले जाते.

मुंबई - मुंबई भाजप अध्यक्षपदी सलग दोन वेळा आमदार असलेले आशिष शेलार यांच्या जागी कुणीची वर्णी लागणार, याबाबत सध्या खलबते सुरू आहेत. यामध्ये योगेश सागर, अतुल भातखळकर, पराग आळवणी यांच्यासह लोकसभा निवडणूक लढवणारे मनोज कोटक यांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये कोटक यांचे पारडे जड असल्याचे मानले जाते.

आमदार शेलार यांनी सहा वर्षांपूर्वी मुंबई भाजपचे अध्यक्ष म्हणून कारभार हाती घेतला. त्यांची मुदत जून महिन्याअखेर संपत आहे. सलग दोन वेळा अध्यक्षपदी राहिल्यानंतर तिसऱ्यांदा अध्यक्षपदी राहण्यासाठी विशेष ठराव भाजपला करावा लागणार आहे. असा ठराव भाजप करणार आहे का? हा प्रश्‍न सध्या चर्चिला जात आहे. त्याचबरोबर राज्यात ऑक्‍टोबर महिन्यात विधानसभेची निवडणूक आहे. मुंबईत 36 विधानसभा मतदारसंघ आहेत. तोपर्यंत शेलार यांना अध्यक्षपदी कायम ठेवणार, अशी शक्‍यताही वर्तवली जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Mumbai Chairman Manoj Kotak Politics