'मुख्यमंत्री, तुमच्या मुलानं पदाचा दुरुपयोग केला', नीलेश राणेंचा आरोप

पूजा विचारे
Wednesday, 12 August 2020

माजी खासदार नीलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे. ट्विट करुन त्यांनी नीले राणेंनी सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून ठाकरे पिता-पुत्रांना लक्ष्य केलं आहे.

मुंबईः अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीला सुरुवात झाली आहे. या सुनावणीदम्यान राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख सर्वोच्च न्यायालयामध्ये झाल्याचा दावा भाजपाचे नेते निलेश राणे यांनी केला आहे. यावरुनच माजी खासदार नीलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे. ट्विट करुन त्यांनी नीले राणेंनी सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून ठाकरे पिता-पुत्रांना लक्ष्य केलं आहे.

निलेश राणे यांनी ट्विटरवरुन उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे तुमच्या मुलाचं नाव सुप्रीम कोर्टाच्या रेकॉर्ड मध्ये आले... की आदित्य ठाकरेचा सुशांत सिंग राजपूतच्या केस मध्ये सहभाग जाणवतो. तुम्हाला आणि तुमच्या मुलाला लवकरच राजीनामा द्यावा लागेल कारण ह्या केस मध्ये तुम्ही आणि तुमच्या मुलाने पदाचा दुरुपयोग केला आहे, अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे.

 

मात्र या प्रकरणाशी आदित्य ठाकरेंचा काहीही संबंध नसल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी एका वृत्तावाहिनीशी बोलताना स्पष्ट केलं आहे. आदित्य ठाकरेंचा या सर्व प्रकरणाशी काय संबंध? हिंमत असेल तर भाजपच्या लोकांनी जाहीरपणे त्यांचं नाव घ्यावं. ते चांगलं काम करत आहेत, मदत करत आहेत. बदनामी करण्याची मोहीम सुरु असून हे चांगलं राजकारण नसल्याची टीका टीका संजय राऊत यांनी केली.

हेही वाचाः  ईशान्य मुंबईत कशी आहे कोरोनाची परिस्थिती, वाचा सविस्तर

सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणामध्ये पाटणा पोलिसांकडे सुशांतच्या वडीलांनी दाखल केलेली तक्रार ही ग्राह्य धरून बिहार पोलिसांनी चौकशी न करता या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांना करु देण्यात यावी यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

अधिक वाचाः  अरे देवा! दक्षिण मुंबईतल्या 'या' भागात वाढतोय कोरोनाबाधितांचा आकडा

राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यापासून भाजप शिवसेनेला सातत्यानं लक्ष करत आहे. त्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये गेलेले राणे पिता-पुत्र उद्धव ठाकरे आणि आदित्य यांच्यावर नेहमीच टीका करताना दिसतात.

bjp nilesh rane react aaditya thackeray and cm uddhav thackeray sushant singh rajput case 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp nilesh rane react aaditya thackeray and cm uddhav thackeray sushant singh rajput case