भाजप आरक्षणविरोधी नाही - अमित शहा

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 7 एप्रिल 2018

मुंबई - भाजपने आरक्षणावरून घेतलेल्या भूमिकेबाबत विरोधक अपप्रचार करत असून, आमचा पक्ष आरक्षणाच्या विरोधात नाही. संविधानाने दिलेले आरक्षण रद्द केले जाणार नाही. कॉंग्रेस अथवा अन्य पक्षांनी तसे करण्याचा प्रयत्न केल्यास भाजप त्याला कडाडून विरोध करेल, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज येथील महामेळाव्यामध्ये बोलताना केले. 

शहा म्हणाले, ""जगभर भारताचा डंका वाजू लागला आहे. कॉंग्रेस पक्ष आणि आमचे विरोधक चार वर्षांत मोदी सरकारने काय केले, असे म्हणत हिशेब मागत आहेत. मात्र आम्ही चार वर्षांत काय केले, हे तुम्ही विचारत असला तरी देशातील जनता कॉंग्रेसला चार पिढ्यांचा हिशेब मागत आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपचे राज्य असले, तरी हा भाजपचा सुवर्ण काळ नाही. ज्या वेळी ओडिशा, पश्‍चिम बंगाल आणि 2019 ला केंद्रात पुन्हा एनडीएप्रणीत मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचे राज्य येईल, तो सुवर्णकाळ असेल. भाजप कार्यकर्त्यांनी त्यासाठी आतापासून कामास लागावे.'' 

सरकारला क्‍लीन चिट 
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार असल्याचा वावड्या उठत असताना अमित शहा यांनी मात्र ही शक्‍यता फेटाळून लावली. भाजपच्या महामेळाव्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना शहा यांनी विरोधकांवर टीका केली. मोदी देशातील सर्वांत लोकप्रिय नेते असून, त्यांना पराभूत करण्यासाठी सर्व विरोधक एकवटले आहेत. देशामध्ये संघर्ष निर्माण व्हावा यासाठी विरोधक जाणीवपूर्वक दुही निर्माण करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, आजच्या महामेळाव्यामध्ये भाजपच्या सर्वच नेत्यांनी भाषणे केली, पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे भाषण प्रभावी ठरल्याची चर्चा नेत्यांमध्ये होती. 

Web Title: BJP is not against reservation - Amit Shah