'तांडव' वेबसिरीजला भाजपचा विरोध, राम कदमांचा पोलिस ठाण्यावर मोर्चा

निलेश मोरे
Sunday, 17 January 2021

वेब सिरीज " तांडव ' वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. घाटकोपर पश्चिमचे भाजप आमदार राम कदम यांनी निषेध व्यक्त करत घाटकोपर चिरागनगर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला.

मुंबईः अॅमेझॉन प्राईमवर नुकतीच प्रदर्शित झालेली वेब सिरीज " तांडव ' वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या वेब सिरीजमध्ये दाखवण्यात आलेल्या एका दृश्यामुळे हिंदू देवदेवतांचा अपमान झाला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी आज घाटकोपर पश्चिमचे भाजप आमदार राम कदम यांनी निषेध व्यक्त करत घाटकोपर चिरागनगर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. यावेळी तांडव वेब सिरीजचे निर्माते , दिग्दर्शक आणि अभिनेता यांच्यावर कडक कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असल्याचे आमदार राम कदम यांनी सांगितले. 

तांडव या प्रदर्शित झालेल्या वेब सिरीज विरोधात भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले असून खासदार मनोज कोटक यांनीही केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून वेब सिरीजच्या निर्मात्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे. यावेळी घाटकोपर पोलिस ठाण्याबाहेर भाजप कार्यकर्त्यानी तांडव वेब सिरिज विरोधात घोषणा देत हिंदू देवतांवो का अपमान, नही सहेगा हिंदुस्थान, बंद करा बंद करा तांडव सिरीज बंद करा अशा घोषणा दिल्या.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तांडव या प्रदर्शित झालेल्या वेब सिरीजमध्ये दाखवण्यात आलेल्या एका दृष्यात भगवान शंकर यांच्यावर एक आक्षेपार्ह संभाषण केल्याने देशातील समस्त हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे आम्ही या वेब सिरीजला विरोध करून ती बंद करण्याची मागणी करत आहोत जो पर्यंत गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत पोलिस ठाण्यातून हटणार नाही अशी भूमिका कदम यांनी घेतली असता घाटकोपर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हितेंद्र आगरकर यांनी बाजू समजून घेऊन आम्ही तांडव वेब सिरीज मधील संभाषणचा आक्षेपार्ह व्हिडीओ पोलिसांना दाखवला. त्यात पोलिसांनी हिंदू लोकांच्या भावना दुखावल्या असल्याचे मान्य करत वेब सिरीजच्या निर्मात्यांसह तिघांना समन्स पाठवून त्यांना पोलिस ठाण्यात हजर करून त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी कदम यांना सांगितले. 

अॅमेझॉन प्राईमच्या कार्यालयावर उद्या राम कदम काढणार मोर्चा

तांडव ही वेब सिरीज 15 जानेवारीला अॅमेझॉन प्राईमवर प्रसिद्ध झाल्या. नंतर तांडव सिरीज नंतर अॅमेझॉन प्राईम वरही वाद होत आहेत. आज या सिरीज विरोधात निर्मात्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेले आमदार राम कदम उद्या  सकाळी अॅमेझॉन प्राईमच्या कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले. 

हेही वाचा- लसीकरणाच्या नोंदणीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांपासून सावधान !

---------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

BJP opposes Tandav webseries Ram Kadam protest police station


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP opposes Tandav webseries Ram Kadam protest police station