भाजपचा पराभव हा शिवद्रोह' 'महाराष्ट्रद्रोह'- शेलार

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

मुंबई - भाजपला पराभूत करणे हाच शिवसेना व कॉंग्रेसचा एकमेव अजेंडा असून, या दोन्ही पक्षांनी एकमेकाला पूरक असे उमेदवार उभे करून मॅच फिक्‍सिंग केल्याचा आरोप करत हा शिवद्रोह, मुंबईद्रोह व महाराष्ट्रद्रोह आहे, असा अजब दावा मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज प्रचार सभेत केला. 

कॉंग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षांची यादी घेऊन अभ्यास केल्यानंतर हे लक्षात आल्याचा दावाही त्यानी भाषणात केला. आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. विलेपार्ले येथील कॉंग्रेस कार्यकर्त्या माझ्याशी भेटल्यानंतर या मॅच फिक्‍सिंगचा अभ्यास केल्याचे शेलार म्हणाले. अशाप्रकारे भाजपच्या पराभवासाठी कॉंग्रेस व शिवसेनेत मॅच फिक्‍सिंग झाली असून, हा महाराष्ट्रद्रोह असल्याचा अजब तर्क त्यांनी मांडला. याबद्दल खुली चर्चा करण्यास तयार असल्याचेही आव्हान त्यांनी कॉंग्रेस व शिवसेनेला दिले. 

आशिष शेलार सध्या पुराणकथांमध्ये असतात आणि तसे ते अविश्वसनीय दाखले देत आहेत. अत्यंत आत्मविश्वासाने खोटे बोलणाऱ्या पक्षाचे ते नेते आहेत. त्यांचे वक्तव्य म्हणजे भाजपने पराभव मान्य केल्याची सुरवात आहे. 
संजय निरुपम, मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष 

Web Title: BJP president Ashish Shelar