कोणाचाही राजीनामा मिळालेला नाही, चंद्रकांत पाटील यांचे स्पष्टीकरण

कृष्ण जोशी
Monday, 19 October 2020

एकनाथ खडसे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे भाजप सदस्यत्त्वाचा राजीनामा पाठवला असून ते येत्या गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचीही चर्चा रंगू लागली आहे. त्यावर आता चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 

मुंबईः भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिल्याच्या चर्चा पुन्हा सुरु झाल्या आहेत.   एकनाथ खडसे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे भाजप सदस्यत्त्वाचा राजीनामा पाठवला असून ते येत्या गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचीही चर्चा रंगू लागली आहे. त्यावर आता चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 

आपल्याला अद्याप पक्षाच्या कोणाही ज्येष्ठ वा कनिष्ठ नेत्याचे राजीनामा पत्र मिळाले नाही. पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे असे काही करतील असे आपल्याला वाटत नसल्याचा खुलासा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

एकनाथ खडसे लवकरच पक्ष सोडण्याबाबत वृत्त प्रसिद्ध होत आहेत. त्यांनी आपला राजीनामा देखील दोन-तीन दिवसांपूर्वीच चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठवून दिल्याचेही सांगितले जात आहे. मात्र चंद्रकांत पाटील यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. 

ज्याला कोणाला पक्ष सोडायचा असेल त्याने पक्षाचा राज्य अध्यक्ष या नात्याने माझ्याकडेच राजीनामा पत्र पाठवायला हवे. आपल्याकडे अद्याप कोणाचेही राजीनामा पत्र आले नाही. एकनाथ खडसे पक्ष सोडतील असे आपल्याला वाटत नाही नाही. ते पक्षाचे नुकसान होईल असे पाऊल उचलणार नाही नाहीत असे पाटील यांनी सकाळला सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून भाजपवर नाराज असलेले एकनाथ खडसे पक्षाला रामराम करुन राष्ट्रवादीमध्ये जाणार, अशी चर्चा सुरू आहे. त्यातच एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची भेट शनिवारी घेतली. तसंच नाथाभाऊ आणि अनिल देशमुख यांनी एकाच गाडीतून प्रवास देखील केला. या भेटीदरम्यान खडसेंच्या पक्षांतराचा मुहुर्त ठरल्याचंही बोललं जात आहे.

--------------------------

(संपादनः पूजा विचारे)

BJP President Chandrakant Patil On resign BJP leader Eknath Khadse


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP President Chandrakant Patil On resign BJP leader Eknath Khadse